शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
3
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
4
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
5
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
6
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
7
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
8
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
9
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
10
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
11
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
12
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
13
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
14
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
15
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
16
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
17
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
18
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
19
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
20
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
Daily Top 2Weekly Top 5

नव्या खाडीपुलामुळे कोंडी वाढणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2018 01:09 IST

ठाणे कळवा खाडीवर उभारण्यात येणाºया तिसºया पुलाचे काम आता मार्गी लागत असले तरी हा पूल जेथे उतरत आहे तेथून पुढे असलेल्या विटावा बोगद्याच्या चिंचोळ्या मार्गामुळे

ठाणे : ठाणे कळवा खाडीवर उभारण्यात येणाºया तिसºया पुलाचे काम आता मार्गी लागत असले तरी हा पूल जेथे उतरत आहे तेथून पुढे असलेल्या विटावा बोगद्याच्या चिंचोळ्या मार्गामुळे पुन्हा कोंडी होण्याची भीती व्यक्त होत आहे. घोडबंदर मार्गावरील पूल जेथे संपतात व नवा पूल सुरु होतो त्या जंक्शनपाशी वाहतूक कोंडी होत असल्याने त्याचा फटका वाहन चालकांना बसतो आहे. त्यामुळे ठाणे-कळवा खाडीवरील पुलाचे काम पूर्ण होण्यापूर्वीच यावर तोडगा काढावा, अशी आशा आहे.मुंबईतील सी लिंकच्या धर्तीवर ठाणे महापालिकेने विटावा पुलाखालील वाहतूक कोंडी सुटावी यासाठी या कळवा खाडी पुलावर तिसरा नवीन पुलाच्या कामाचा प्रस्ताव जानेवारी २०१२ मध्ये मांडला होता. सध्या कळवा खाडीवर एक ब्रिटीशकालीन आणि आणखी एक पूल आहे. परंतु ब्रिटीशकालीन पूल कमकुवत झाल्याने त्या पुलावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. त्यामुळे दुसºया पुलावरील वाहतुकीचा वेग मंदावला आहे. हा दुसरा पूल वाहतुकीसाठी कमी पडू लागल्याने पालिकेने तिसºया पुलाचा पर्याय मांडला. महापालिकेने २०११-१२ या आर्थिक वर्षात यासाठी १० कोटींची तरतूद केली होती. आता या पुलासाठी १८३ कोटींचा खर्च केला जाणार आहे.जुन्या दोन पुलांच्या बाजूलाच मात्र त्यांच्यापेक्षा थोड्या उंचीवर हा पूल उभारण्यात येणार आहे. ठाण्याकडून विटाव्याकडे जाण्यासाठी हा वन-वे पूल असणार आहे तर विटाव्याकडून येणाºया वाहनांसाठी जुन्या पुलाचा पर्याय उपलब्ध आहे. या तिसºया पुलामुळे येथील वाहतूक कोंडी सुटण्यास मदत होणार असल्याचा दावा पालिकेने केला आहे. ठाण्याकडून खारेगांव (मनिषा नगर) आणि विटाव्याच्या पुढे म्हणजेच ठाणे - बेलापूर दिशेला असा दोनही मार्गाने हा पूल खाली उतरणार आहे. तसेच कळव्याकडून ठाण्याकडे येतांना हा पूल साकेत, जेल तलाव आणि कोर्टनाका मार्गे ठाणे स्टेशनकडे खाली उतरणार आहे. आता यात थोडा बदल केला असून, आत्माराम चौकापर्यंत रस्ता या पुलाला जोडण्यात येणार आहे.