शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
4
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
5
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
6
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
7
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
8
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
9
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
10
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
11
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
12
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
13
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
14
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
15
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
16
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
17
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
18
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
19
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
20
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 

जागेअभावी पाच विहिरींचे ५६ लाख रुपये गेले परत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2020 00:01 IST

फक्त पालीच्या विहिरीचे काम पूर्ण : जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत मंजुरी

मयूर तांबडे।

नवीन पनवेल : जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत मंजूर करण्यात आलेल्या सहा विहिरींपैकी पाच विहिरींचे ५६ लाख रुपये जागेअभावी परत गेले आहेत. त्यातील केवळ पाली येथील एका विहिरीचे काम पूर्ण झाले आहे. पनवेल परिसरात विविध प्रोजेक्ट नव्याने येत आहेत. तसेच काही प्रोजेक्टचे काम प्रगतिपथावर आहे. त्यामुळे पनवेलमधील जागेला सोन्याचा भाव आलेला आहे. पनवेल परिसरात ठिकठिकाणी मोठ्या इमारती बांधण्यात आलेल्या आहेत. अशा परिस्थितीत जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत मंजूर करण्यात आलेला पाच विहिरींना जागा मिळाली नाही.

२०१८-१९ मध्ये जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत पनवेल तालुक्यात सहा विहिरी मंजूर करण्यात आल्या होत्या. त्यात तामसई, सारसई, वाजे, बोंडारपाडा, पाली आणि सारसई, (माड भवन) येथे ६७ लाख ३८ हजार रुपये खर्च करून विहिरी बांधण्यात येणार होत्या. त्या मंजूर होऊन ठेकेदारांना काम देण्यात आले. एकूण सहा विहिरींचे ६७ लाख ३८ हजार रुपयांचे काम होते. ते काम सुरू करण्याचा आदेश प्राप्त झाला. मात्र जागेअभावी पाच गावांतील विहिरींचे ५६ लाख रुपये परत गेले आहेत. यातील केवळ पाली येथील विहिरीचे काम पूर्ण झाले आहेग्रामपंचायत स्तरावर विहिरीसाठी जागा देणे क्रमप्राप्त होते. विहीर बांधण्यासाठी जागेचा शोध घेण्यात आला. मात्र, कोणीही जागा देण्यास पुढे आले नाही. जागामालक जास्त पैसे मागत असल्याने ती जागा परवडत नाही. तालुक्यातील पाली गावाजवळ केवळ एक जागा मिळाली. त्या ठिकाणी विहिरीचे बांधकाम पूर्ण झाले आहे. पनवेल परिसरात शासकीय कामांसाठी जागेसाठी कसरत करावी लागत आहे. त्यामुळे अनेक शासकीय प्रकल्प जागेअभावी परत जात आहेत. 

टॅग्स :panvelपनवेल