शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

शासनाकडून अ‍ॅप न मिळाल्याने फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी रखडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2017 15:29 IST

शासनाकडून फेरीवाल्यांचा बायोमेट्रीक सर्व्हे करण्याचा अ‍ॅप पाच महिने उलटूनही न मिळाल्याने, ठाणे महापालिकेची फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी रखडली असल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे शासनाकडून आखण्यात आलेल्या कार्यक्रमाला त्यांच्याकडूनच यामुळे हरताळ फासण्यात आला आहे.

ठळक मुद्दे१५ मे २०१७ रोजी मिळणार होते शासनाकडून अ‍ॅपशासनाकडून फेरीवाला धोरणाला फासला जातोय हरताळशहरात आजच्या घडीला १० हजारांच्या आसपास फेरीवाले

ठाणे - फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी शासन निर्णयानुसार सहा महिन्यात करणे अपेक्षित असतांनाही आज साडेतीन वर्षे उलटूनही महापालिका केवळ सर्व्हेच्या पलिकडे काही करु शकलेली नाही. शासनाच्या नव्या धोरणानुसार पालिकेने समिती देखील गठीत केली आहे. तसेच बायोमेट्रीक सर्व्हे देखील करण्यात आला आहे. परंतु शासनाकडून उपलब्ध होणारे अ‍ॅप अद्यापही पालिकेला उपलब्ध न झाल्याने पालिकेचा नव्याने होणारा सर्व्हे तर रखडलाच आहेच, शिवाय यामुळे फेरीवाला धोरणाची होणारी अंमलबजावणी देखील लांबणीवर पडली आहे.ठाणे महापालिकेने जून २०१४ पासून शहरातील फेरीवाल्यांची नोंदणी करण्यास सुरवात होती. आता फेरीवाल्यांची नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाली असून शहरातील फेरीवाल्यांचा बायोमेट्रीक सर्व्हे देखील पूर्ण झाला असल्याचा दावा पालिकेने केला आहे. या सर्व्हेनुसार आता शहरात सुमारे १० हजारांच्या आसपास फेरीवाले असणार आहेत. पालिका आता, या फेरीवाल्यांकडून रजिस्ट्रेशनची फी आकारुन त्यांना जागा देणार आहे. त्यानुसार काही काळ का होईना हे फेरीवाले आता शहरभर आपल्या जागेवर दिसतील अशी आशा आहे. विशेष म्हणजे पालिकेने मागील साडेतीन वर्षात शासनाच्या बदललेल्या नियमानुसार दोन वेळा सर्व्हे झाला. त्यानंतर आता फेरीवाला समिती गठीत करण्यासाठीचा आध्यादेश पुढे आल्याने पालिकेने त्याची तयारी सुरु केली होती. या समितीमध्ये जवळ जवळ विविध प्रकारचे सदस्य मिळाले असून ही समिती देखील गठीत झाल्याचा दावा पालिकेने केला आहे.दरम्यान, एल्फीस्टन रेल्वे पादचारी पुलावर झालेल्या दुर्घटनेनंतर फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी विविध संघटनांकडून दबाव आणला जात आहे. परंतु पालिकेला अदयापही या धोरणाची अंमलबजावणी करता आलेली नाही. यामागे शासनाचे वारंवार बदलत असलेले धोरणच अडसर येत असल्याची माहिती आता समोर येत आहे.शासनाने नव्याने फेरीवाल्यांचा बायोमेट्रीक सर्व्हे घेण्यास सांगितले असून या संदर्भातील अ‍ॅप शासनाकडून पालिकेला १५ मे मिळणार होते. परंतु आज पाच महिने उलटले तरी देखील हे अ‍ॅप अद्यापही पालिकेला मिळालेले नाही. या अ‍ॅपनुसारच पुन्हा फेरीवाल्यांचा सर्व्हे केला जाईल अशी भुमिका पालिकेने घेतली आहे. शासनाच्या अँप प्रमाणे सामाजिक आणि आर्थिक सर्व्हे १५ आॅगस्ट २०१७ पर्यंत पूर्ण करणे अपेक्षित होते. परंतु आॅक्टोबर महिना संपत आला तरी देखील हे अ‍ॅपचा पालिकेला उपलब्ध झालेले नाही. हे अ‍ॅप वेळेत उपलब्ध झाले असते तर फेरीवाल्यांची यादी १५ सप्टेंबर २०१७ पर्यंत प्रसिद्ध करणे शक्य होते. तसेच सर्व्हेक्षणानंतर ओळखपत्र आणि व्रिक्र ीचे प्रमाणपत्र देणे देखील ३० डिसेंबर २०१७ पर्यंत देणे शक्य झाले असते. तसेच १५ फेब्रुवारी २०१८ पर्यंत अंमलबजावणीसाठी सविस्तर आराखडा तयार करून तो शासनाला सादर करणे शक्य झाले असते. परंतु शासनाकडूनच अद्याप अ‍ॅप न मिळाल्याने त्यांच्याकडूनच तयार झालेल्या या कार्यक्रम पत्रिकेला शासनानेच हरताळ फासल्याचे स्पष्ट झाले आहे. 

टॅग्स :thaneठाणेtmcठाणे महापालिकाGovernmentसरकार