शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे लाचखोरांचे फावतेय!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2020 23:38 IST

नियमाला तिलांजली दिली जात असल्याने लाचखोरी प्रकरणात निलंबन संपुष्टात आलेले सर्वच अधिकारी आणि कर्मचारी आजघडीला कार्यकारी पदावर कार्यरत

- प्रशांत मानेकल्याण-डोंबिवली महापालिकेत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची लाचेची हाव कमी होत नसल्याची प्रचीती वारंवार घडणाऱ्या घटनांमधून येत आहे. महापालिकेचे जलनि:सारण आणि मलनि:सारण विभागाचे प्रभारी कार्यकारी अभियंता बाळासाहेब जाधव यांना अलीकडेच लाच स्वीकारताना अटक झाली. या घटनेच्या माध्यमातून केडीएमसी ‘भ्रष्टाचाराची गंगोत्री’ असल्याचे पुन्हा एकदा निदर्शनास आले. अशा लाचखोरांना पुन्हा सेवेत घेताना त्यांना अकार्यकारीपद देणे बंधनकारक आहे. परंतु, या नियमाला तिलांजली दिली जात असल्याने लाचखोरी प्रकरणात निलंबन संपुष्टात आलेले सर्वच अधिकारी आणि कर्मचारी आजघडीला कार्यकारी पदावर कार्यरत आहेत. अधिकारी आणि कर्मचाºयांची वानवा असल्याचे स्पष्टीकरण या नियुक्त्यांचे समर्थन करताना प्रशासनाच्या वतीने दिले जात असले, तरी दुसरीकडे ही कृती ‘लाचखोरीला’ प्रोत्साहन देणारी ठरत आहे.ेमहापालिकेत आतापर्यंत लाचखोरीमध्ये कारवाई झालेल्या अधिकारी आणि कर्मचाºयांची संख्या ३० हून अधिक आहे. अशा लाचखोरांवर कठोर कारवाई होणे अपेक्षित असताना सरकारी निर्णयही लाचखोरांच्या हिताचेच ठरत आहेत. २०११ च्या निर्देशानुसार निलंबित झाल्यापासून दोन वर्षांत पुन्हा संबंधित लाचखोर अधिकारी आणि कर्मचारी सेवेत दाखल होऊ शकतो. लाचखोरीच्या प्रकरणात पकडले गेल्यानंतर संबंधित लाचखोर अधिकारी आणि कर्मचाºयाला पहिले सहा महिने अर्धे वेतन द्यावे लागते. नंतर, ७५ टक्केवेतन देणे बंधनकारक करण्यात आले आहे. लाचलुचपत प्रकरणात निलंबित असलेल्यांना पुन्हा सेवेत घेण्यासाठी प्रत्येक महापालिकेत ‘निलंबन आढावा समिती’ असते. त्याप्रमाणे केडीएमसीतही निलंबन आढावा समितीच्या बैठकांमध्ये निलंबितांना पुन्हा सेवेत दाखल करून घेण्यासंदर्भात निर्णय घेतले जातात. परंतु, त्यांना सेवेत दाखल करून घेताना राज्य सरकारच्या निलंबित सरकारी सेवकांच्या २०११ च्या निर्देशानुसार जिथे भ्रष्टाचाराला वाव आहे, अशा कार्यकारीपदापासून दूर ठेवण्याचे आदेश आहेत. मात्र, त्याकडे दुर्लक्ष झाले आहे. विशेष बाब म्हणजे केडीएमसीत सुरुवातीपासूनच लाचखोरांना कार्यकारीपदे बहाल केली गेली आहेत. आजही हे चित्र कायम आहे. सरळसेवा भरतीवर सरकारकडून निर्बंध लागू आहेत. त्यामुळे उपलब्ध अधिकारी आणि कर्मचारी यांच्याकडून काम करून घेतल्याशिवाय दुसरा पर्याय शिल्लक राहत नाही, असे प्रशासनाचे म्हणणे आहे. मुदलात ‘जाऊ तिथे खाऊ’ ही प्रवृत्ती केडीएमसीत आजही कायम असून तिला पोषक असेच घडताना दिसत आहे.

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिकाBribe Caseलाच प्रकरणAnti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभाग