शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

दुर्धर आजाराला कंटाळून ठाण्यात विवाहितेची उपवन तलावात आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2019 21:53 IST

आपण आजाराला कंटाळून आत्महत्या करीत आहे, असे फोनवरुन भावाला सांगून रुपादेवी पाडा, इंदिरानगर येथील ढेकणी यादव या विवाहितेने उपवन तलावात उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी रात्री घडली.

ठळक मुद्देवर्तकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखलआत्महत्येपूर्वी केला भावाला फोन तीन तासांच्या शोध कार्यानंतर मिळाला मृतदेह

ठाणे: क्षय रोगा (टीबी) सारख्या दुर्धर आजाराला कंटाळून ढेकणी जगदारी यादव (४९, रा. इंदिरानगर, रुपादेवी पाडा क्र. २, ठाणे) या विवाहितेने उपवनच्या तलावात उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी रात्री घडली. तब्बल तीन तास शोध घेऊन ठाणे महापालिका अग्निशमन दलाच्या जवानांनी तिचा मृतदेह बाहेर काढला. याप्रकरणी वर्तकनगर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्युची नोंद करण्यात आली आहे.ढेकणी हिला गेल्या २० वर्षांपासून टीबीच्या आजाराने ग्रासले होते. टीबीवरील रोजच्या औषधाला आणि आजारपणाला कंटाळून आत्महत्या करीत असल्याचे तिने ३० एप्रिल रोजी रात्री ७.३० वाजण्याच्या सुमारास भाऊ संतोष यादव (३९) याला फोनवरुन सांगितले. त्याआधी सायंकाळी ५ वा. च्या सुमारास उपवनला जाते, असे सांगून ती घराबाहेर पडली होती. भावाला फोन केला त्यावेळी त्याच्यासोबत तिचे पती जगदारी (४९) हे देखिल मुलूंड येथे होते. भाऊ रिक्षा चालक असून जगदारी हे एका स्टील कंपनीत नोकरीला आहेत. गेली तीन महिने मुंबईतील शिवडी येथील टीबी रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरु होते. चारच दिवसांपूर्वी तिला रुग्णालयातून घरी सोडण्यात आले होते. नेहमीच्या आजारामुळे वैफल्यग्रस्त झाल्याने तिने अखेर उपवन तलावात स्वत:ला झोकून देत आत्महत्या केली. तिचा फोन आल्यामुळे धावाधाव करीतच भाऊ आणि पतीने वर्तकनगर पोलिसांना ही माहिती दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप गिरधर यांच्या पथकाने ठाणे महापालिकेच्या वागळे इस्टेट अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या मदतीने रात्री ९ ते १२ या दरम्यान उपवन तलावात तिचा शोध घेतला. अखेर १२ वा. च्या सुमारास तिचा देह मिळाल्यानंतर तिला तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतू, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच तिचा मृत्यु झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. शवविच्छेदनानंतर तिचा मृतदेह पोलिसांनी बुधवारी सकाळी नातेवाईकांकडे सुपूर्द केला. याप्रकरणी वर्तकनगर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक अमोल जाधव हे अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीSuicideआत्महत्या