शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
2
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
3
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
4
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
5
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
6
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
7
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
8
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
9
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
10
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
11
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
12
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
13
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
14
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
15
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
16
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
17
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
18
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
19
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
20
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

जीएसटीच्या मुद्यावरुन पालिकेत संभ्रम कायम, विकास कामांना लागला ब्रेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2017 15:55 IST

ठाणे महापालिकेत आजही जीएसटी बाबत संभ्रम कायम आहे. १५ सप्टेंबर पर्यंत, दराबाबत निश्चिती होणार होती. परंतु आता नोव्हेंबर संपत आला तरी शासनाकडून पालिकेला याची माहिती न मिळाल्याने विकास कामांबाबत पालिकेत संभ्रमाचे वातावरण आहे.

ठळक मुद्देअनेक विकास कामांना लागला ब्रेकमुख्यालय दुरुस्तीचे काम मात्र झाले सुरुजीएसटीच्या स्लॅब बाबत अद्यापही संभ्रम कायम

ठाणे - नव्याने लागू झालेल्या जीएसटी कर प्रणालीचा फटका ठाणे महापालिकेच्या महत्वाकांक्षी प्रकल्पना बसला असून या प्रकल्पांच्या निविदा रद्द करून नव्याने निविदा काढण्यात आल्या आहेत. २२ आॅगस्ट पर्यंत ज्या कामांची वर्क आॅडर देण्यात आलेली नाही. अशा कामांना याचा फटका बसला आहे. परंतु अद्यापही जीएसटीच्या दराबाबत निश्चित असे धोरण ठरविण्यात आलेले नाही. किंबहुना दर निश्चितीबाबत आजही सावळा गोंधळ असल्याने काम सुरु केले तरी देखील उद्या दर वाढले तर काय असा प्रश्न ठेकेदारांसह पालिकेला देखील पडला आहे. त्यामुळे विकास कामांना ब्रेक लागलेलाच असल्याचे चित्र आहे.केंद्र सरकाराने १ जुलैपासून जीएसटी लागू केला आहे. त्यानंतर राज्य शासनाने स्थानिक स्वराज्य संस्थांना एक परिपत्रक धाडून २२ आॅगस्ट पर्यंत ज्या विकास कामांना वर्क आॅर्डर देण्यात आलेली नाही. ती कामे रद्द करुन त्याच्या पुन्हा निविदा काढण्यात याव्यात असे या परिपत्रकात नमुद करण्यात आले होते. परंतु दुसरीकडे अत्यावश्यक कामांना यामधून वगळण्यात आले आहे. अत्यावश्यक कामांमध्ये औषधे, पावसाळ्यातील रस्ता दुरुस्तीची प्रकरणे असतील अशांसह इतर अत्यावश्यक कामांना यातून वगळण्यात आले आहे. त्यामुळे पालिकेच्या विकास कामांना खीळ बसणार हे यापूर्वीच स्पष्ट झाले आहे. परंतु शासनाकडून दर निश्चिती बाबत स्लॅब येणार होते. ते अद्यापही पालिकेला प्राप्त झालेले नाहीत. कोणत्या वस्तुवर किती कर असेल कोणत्या वस्तुवर कर कमी झालेला असेल यासह इतर काही महत्वांच्या नियमांचा यात उल्लेख असणार आहे. परंतु शासनाकडून अद्यापही ही माहिती पालिकेला देण्यात आलेली नाही. याचा परिणाम म्हणून सार्वजिक बांधकाम विभाग आणि पाणी पुरवठा विभागाला जास्तीचा फटका बसला आहे. गेल्या सात वर्षांपासून रखडलेली मुंब्रा वॉटर रिमॉडेलींग योजना आणखी रखडणार आहे. स्मार्ट वॉटर मीटर योजनेला पुन्हा खीळ बसली असून पाच वेळेला निविदा काढूनही त्याला अद्यापही प्रतिसाद मिळालेला नाही. मुंब्य्राच्या रिमॉडेलींग योजनेसाठी १२६ कोटींचा खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे. तर स्मार्ट वॉटर मीटर योजनेसाठी १२.५० कोटींचा खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे. याशिवाय पालिका मुख्यालयाच्या दुरुस्तीच्या विषयावरुन देखील वादंग निर्माण झाला होता. मुख्यालय दुरुस्तीसाठी ५.८९ कोटींचा खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे. त्यानंतर हेच काम सध्या सुरु असून चार दिवसापासून मुख्यालय दुरुस्तीच्या कामाला सुरवात झाली आहे. याशिवाय सार्वजनिक बांधकाम विभागातील अनेक छोट्यामोठ्या विकास कामांना देखील याचा फटका बसला आहे. जीएसटीमुळे या खर्चात वाढ होणार की कमी होणार याचा अंदाज १५ सप्टेंबरनंतरच लावता येणार होता. परंतु अद्यापही शासनाकडून जीएसटीचे स्लॅबची माहितीच पालिकेला उपलब्ध झालेली नाही. त्यामुळे विकास कामांचा वेग मात्र मंदावला आहे.या संदर्भात पालिकेच्या संबधींत विभागाच्या अधिकाऱ्याशी चर्चा केली असता, या संदर्भातील नोटीफीकेशन येत्या नोव्हेंबर अखेर पर्यंत येऊ शकणार आहे. त्यानंतरच विकास कामांचे नियोजन केले जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. 

टॅग्स :Thane Municipal Corporationठाणे महानगरपालिकाthaneठाणेcommissionerआयुक्त