शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
5
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
6
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
7
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
8
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
9
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
10
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
11
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
12
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
13
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
14
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
15
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
16
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
17
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
18
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
19
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
20
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?

महावितरणचे वीज बील थकवल्याने डोंबिवलीतील बीएसएनएल कार्यालये अंधारात

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2019 00:31 IST

डोंबिवलीतील बीएसएनएलच्या चार केंद्रांच्या कार्यालयांनी चार महिन्यांपासून सुमारे १५ लाख ६० हजारांचे वीजबिल थकवल्याने महावितरणने वीजपुरवठा खंडित केला आहे.

डोंबिवली : डोंबिवलीतील बीएसएनएलच्या चार केंद्रांच्या कार्यालयांनी चार महिन्यांपासून सुमारे १५ लाख ६० हजारांचे वीजबिल थकवल्याने महावितरणने वीजपुरवठा खंडित केला आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना दोन-तीन दिवसांपासून अंधारात काम करावे लागत असून शहरातील दूरध्वनी आणि इंटरनेट सेवा कोलमडल्यामुळे ग्राहकांच्या प्रश्नांना तोंड देताना तारांबळ उडत आहे.पूर्वेतील एमआयडीसी, मानपाडा स्टार कॉलनी, टिळकनगर, तर पश्चिमेतील कोपर रोड, आनंदनगर या बीएसएनएल कार्यालयांवर ही कारवाई करण्यात आली आहे. या कार्यालयांत एकूण पाच कनेक्शन असून चार महिन्यांच्या थकबाकीबाबत नोटीस बजावूनही बिल भरले नाही आणि नोटिशीला साधे उत्तरही दिले नाही. त्यामुळे नाइलाजाने महावितरणला हे पाऊ ल उचलावे लागले, असे महावितरणचे कार्यकारी अभियंता धनराज दिक्कड यांनी सांगितले. १५ लाख ६० हजारांचे बिल थकल्याने वरिष्ठांकडून विचारणा होत होती. याशिवाय मार्चमध्ये आॅडिट असल्याने वरिष्ठांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आल्याचे दिक्कड यांनी सांगितले.दूरध्वनी बंद असल्याने ग्राहक दूरध्वनी कार्यालयांमध्ये फेऱ्या मारत आहेत. मात्र, कार्यालयातून काहीच माहिती मिळत नसल्याने ग्राहक हवालदिल झाले आहेत. शहरात सुरू असलेल्या विविध रस्त्यांच्या खोदकामांमुळे तांत्रिक अडचण उद्भवल्याची चर्चा होती; मात्र याबाबत महावितरण अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता खरा प्रकार उघड झाला.दरम्यान, बीएसएनएलएच्या विभागीय व्यवस्थापकांशी याबाबत मोबाइलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.ग्राहकांना मनस्तापबीएसएनएलच्या सावळ्या गोंधळामुळे दूरध्वनी आणि ब्रॉडबॅण्ड ग्राहक वैतागले आहेत. कार्यालयात विचारणा करण्यासाठी गेले असता तेथून काहीच माहिती मिळत नसल्याने ग्राहकांची कोंडी झाली आहे. त्यामुळे त्यांचे कर्मचाºयांशी खटके उडत असून काही जण तर कनेक्शनच काढून टाका, असे सांगत असल्याचे कार्यालयांमध्ये पाहायला मिळत आहे. इंटरनेट सेवा कोलमडल्याने कामे खोळंबली आहेत, असे एका ग्राहकाने सांगितले.