लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : मद्यप्राशन करून एसटी चालवणाऱ्या भिकणराव पाटील (३०) याने घोडबंदर रोडवरील सिग्नल तोडून बस सुसाट नेल्यानंतर वाहतूक नियंत्रण शाखेच्या पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याच्यावर कायदेशीर कारवाई करून पाच हजारांची अनामत रक्कम घेतली. चालकाचा बेदरकारपणा वाहतूक पोलिसांच्या वेळीच निदर्शनास आल्यामुळे सुदैवाने मोठा अपघात टळला आणि बसमधील १६ प्रवासी बचावल्याची माहिती सूत्रांनी दिली.नालासोपारा ते ठाणे ही एसटी मंगळवारी रात्री ९.३० वा.च्या सुमारास घोडबंदर रोडवरील ब्रह्मांड सिग्नलजवळ आली. हा सिग्नल तोडून चालकाने तशीच गाडी भन्नाटपणे दामटली.
वाहतूक पोलिसांच्या दक्षतेमुळे ठाण्यात १६ प्रवासी बचावले
By admin | Updated: June 1, 2017 03:25 IST