शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

बाप्पांच्या दर्शनासाठी भक्तांची गर्दी, टिटवाळ्यात मांदियाळी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2018 03:47 IST

वर्षाची शेवटची अंगारकी चतुर्थी आणि त्यात नाताळच्या सुटीचा दुहेरी योग जुळून आल्याने टिटवाळा येथील महागणपती मंदिरात बाप्पांच्या दर्शनासाठी मंगळवारी भक्तांची मोठी गर्दी झाली होती.

- उमेश जाधवटिटवाळा : वर्षाची शेवटची अंगारकी चतुर्थी आणि त्यात नाताळच्या सुटीचा दुहेरी योग जुळून आल्याने टिटवाळा येथील महागणपती मंदिरात बाप्पांच्या दर्शनासाठी मंगळवारी भक्तांची मोठी गर्दी झाली होती. सोमवारी रात्री १२ वाजताच गणेशाला दुग्धाभिषेक करून मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात आले.सोमवारी रात्री दहा वाजतापासूनच गणेशभक्तांनी दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या. रात्री १२ वाजता देवाला अभिषेक घातल्यावर आरती करण्यात आली. त्यानंतर मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात आले. मंदिर सभामंडपातील दर्शनबारी रात्रीपासून भाविकांनी खचाखच भरली होती. मंगळवारी सकाळी सहा वाजतापासून मंदिर आवारातील व तलावासभोवतालची दर्शन बारीदेखील भाविकांनी पूर्ण भरून गेली. त्यामुळे वाहनांच्या पार्किंगच्या जागेतही भाविकांनी रांगा लावल्या होत्या.श्री साईली मित्रमंडळाच्या वतीने भाविकांसाठी खिचडी आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. रात्री उशिरापर्यंत मंदिर भाविकांसाठी खुले ठेवण्यात आले.वर्षाची शेवटची अंगारकी चतुर्थी आणि नाताळची सुटी असल्याने गर्दी वाढल्याचे भिवंडी येथील गणेशभक्त काका पाटील यांनी सांगितले. लाखाच्या जवळपास भाविकांनी दर्शन घेतल्याचा दावा मंदिराचे विश्वस्त सुभाष जोशी यांनी केला. 

टॅग्स :thaneठाणे