शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनामुळे प्राचीन शिवमंदिर महाशिवरात्रीला राहणार बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2021 00:14 IST

पुजारी, पोलिसांचा निर्णय

अंबरनाथ : येथील प्राचीन शिवमंदिर महाशिवरात्रीला (दि. ११) भाविकांसाठी बंद राहणार आहे. मंदिराचे परंपरागत पुजारी आणि पोलीस यांच्या बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आला. अंबरनाथच्या इतिहासात पहिल्यांदाच महाशिवरात्रीच्या दिवशी कोरोनामुळे देऊळ बंद करण्याची वेळ आली आहे.अंबरनाथचं शिवमंदिर तब्बल ९६१ वर्षे जुने असून, शिलाहार राजा मम्बवाणी याने उभारलेले हे मंदिर स्थापत्यकलेचा उत्कृष्ट नमुना समजलं जातं.

या मंदिराची युनेस्कोनेही नोंद घेतली असून, वर्ल्ड हेरिटेज वास्तूंच्या यादीत या मंदिराचा समावेश केला आहे. या मंदिरात दरवर्षी महाशिवरात्रीला ३ ते ४ लाख भाविक दर्शनासाठी येत असतात. आदल्या दिवशी रात्री १२ वाजता आरती करून मंदिर दर्शनासाठी खुले होते, त्यानंतर सलग २४ तास भाविकांच्या दर्शनासाठी रांगा लागतात. शिवाय अंबरनाथ शहरात महाशिवरात्रीला मोठी जत्राही भरते. संपूर्ण लॉकडाऊनमध्ये हे मंदिर बंद होते. मिशन बिगीन अगेननंतर ते पुन्हा एकदा भाविकांसाठी खुले करण्यात आले. मात्र, आता पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने मंदिरात महाशिवरात्रीला भाविकांना प्रवेश न देण्याचा निर्णय घेतला आहे. या मंदिराचे परंपरागत पुजारी असलेले जुन्या अंबरनाथ गावातील पाटील कुटुंबीय आणि शिवाजीनगर पोलीस यांच्या बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आला.  महाशिवरात्रीला मंदिरात फक्त पुजाऱ्यांना प्रवेश असेल. पुजाऱ्यांकडून सर्व धार्मिक विधी केले जातील. मात्र, कोरोनामुळे सर्वसामान्य भाविकांना यंदा प्रवेश नसेल, अशी माहिती मंदिराचे पुजारी रवि पाटील यांनी दिली. 

मंदिराकडे जाणारे सर्व रस्ते पोलिसांकडून बंद केले जाणार असून, भाविकांनी मंदिराच्या परिसरात येऊ नये. हा सर्व बंदोबस्त महाशिवरात्रीच्या आदल्या दिवशीपासून लावण्यात येणार आहे. त्यामुळे भाविकांनी मंदिर परिसरात येण्याचा प्रयत्न करू नये.- विनायक नरळे, स. पोलीस आयुक्त

‘महाशिवरात्रीची यात्रा रद्द केली असली तरी अंबरनाथ पालिका प्रशासनामार्फत या ठिकाणी देखरेखीसाठी कर्मचारी तैनात करण्यात येणार आहेत. भाविकांनी या ठिकाणी येऊ नये, यासाठी पोलीस प्रशासनाला योग्य ते सहकार्य पालिका प्रशासन करेल.    - डॉ. प्रशांत रसाळ, मुख्याधिकारी

टॅग्स :ambernathअंबरनाथthaneठाणेMahashivratriमहाशिवरात्री