शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

कॉलम खोदतांना ८ गाळे आले खाली, सुदैवाने जिवीतहानी टळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2019 13:57 IST

गाळ्यांच्या ठिकाणी जाण्यासाठी नाल्यावर स्लॅब टाकण्याचे काम सुरु असतांना बाजूला असलेले ८ गाळ्यांचे कॉलम खाली सरकल्याची घटना घडली आहे.

ठळक मुद्दे२२ गाळेधारकांचे झाले होते पुनर्वसनजिवीतहानी नाही

ठाणे - ठाणे महापालिकेने पुनर्वसन केलेल्या गाळ्यांच्या ठिकाणी जाण्यासाठी नाल्यावरुन जाण्यासाठी स्लॅब बांधण्याचे काम महापालिकेच्या वतीने सुरु होते. त्यासाठी कॉलम खोदाईचे काम सुरु असतांनाच बाजूलाच असलेल्या बंद अवस्थेतील ८ गाळ्यांचे कॉलमच खाली सरकल्याची घटना गुरुवारी दुपारी १२ च्या सुमारास वसंत विहार येथे घडली. सुदैवाने यात कोणत्याही प्रकारची जिवीतहानी झाली नाही.                       ठाणे महापालिकेच्या वतीने रस्त्यात बाधीत झालेल्या गाळेधारकांचे वसंत विहार येथील ग्लॅडी अल्वारीस रोड जवळ पुनर्वसन केले होते. याठिकाणी गाळेधारकांनीच या ठिकाणी २२ गाळ्यांचे बांधकाम सुरु केले होते. हे काम अंतिम टप्यात येऊन तेथे दुकानदारांचे फलकही लावण्यासाठी फ्रेम तयार करण्यात आली होती. दरम्यान या गाळ्यापर्यंत जाण्यासाठी रस्त्याच नसल्याने पालिकेने नाल्यावर स्लॅब टाकून त्याठिकाणी जाण्यासाठी रस्ता तयार करुन देण्याची हमी दिली होती. त्यानुसार येथे नाल्याच्या ठिकाणी खोदकाम करुन कॉलम टाकण्याचे काम सुरु होते. परंतु त्याचवेळेस २२ पैकी आठ गाळ्यांचे कॉलम खाली सरकल्याची घटना घडली आहे. सुदैवाने हे गाळे सुरु नसल्याने यात कोणत्याही प्रकारची जिवीत हानी झालेली नाही. परंतु गाळ्यांचे जे काम करण्यात आले होते, ते अतिशय कमकवूत असल्याचा दावा पालिकेने केला आहे. त्यामुळेच ही घटना घडली असावी असा कयास पालिकेने लावला आहे. दरम्यान घटनेची माहिती मिळताच ठाणे महापालिकेचे आपत्ती व्यवस्थापन विभागाचे कर्मचारी आणि अग्निशमन विभाग घटनास्थळी दाखल झाले. 

टॅग्स :thaneठाणेtmcठाणे महापालिकाAccidentअपघात