शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

नाल्याच्या सफाईऐवजी नाल्यात मातीभराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2019 01:18 IST

अंबरनाथ आणि उल्हासनगर शहरांच्या मध्यातून जाणारा वालधुनी नाला हा पावसाळ्यात नागरिकांसाठी धोकादायक ठरण्याची शक्यता आहे.

- पंकज पाटीलअंबरनाथ : अंबरनाथ आणि उल्हासनगर शहरांच्या मध्यातून जाणारा वालधुनी नाला हा पावसाळ्यात नागरिकांसाठी धोकादायक ठरण्याची शक्यता आहे. या नाल्याची सफाई करण्याचे काम अंबरनाथ पालिका करत आहे. तर, दुसरीकडे उल्हासनगर महापालिकेने या नाल्यात मातीभराव करून भुयारी गटाराचे काम सुरू केले आहे. मुख्य नाल्यातच मातीभराव केल्याने पावसाळ्यात पाणी साचण्याचा धोका निर्माण झाला आहे.अंबरनाथ पालिकेने शहरातील मुख्य आणि मोठ्या नाल्यांच्या सफाईचे काम हाती घेतले आहे. शिव मंदिर ते कानसई गावच्या स्मशानभूमीपर्यंतचा नाला साफ करण्याची जबाबदारी ही अंबरनाथ पालिकेवर आहे. मात्र, नाल्याच्या दुसऱ्या टोकावर उल्हासनगर महापालिकेच्या ठेकेदाराने नाल्यातच मातीभराव केल्याचे काही दिवसांपासून दिसते आहे. शहरातील महत्त्वाचा रस्ता असतानाही या नाल्यातील गाळ काढण्याऐवजी त्या नाल्यात मातीभराव करण्यात आला आहे. पावसाळ्यात हा नाला भरून वाहतो. त्यामुळे अंबरनाथ पालिका सर्वात आधी याच नाल्याची सफाई करते. यंदा काम करण्यासाठी गेलेल्या पालिकेला नाल्यातच मातीभराव दिसला.मुळात दोन्ही शहरांच्या मध्यभागी हा नाला असल्याने नाल्याचे एक टोक पालिकेच्या हद्दीत, तर दुसरे टोक हे उल्हासनगर महापालिकेच्या हद्दीत आहे. या उल्हासनगर हद्दीतील नाल्याच्या शेजारी पालिकेने भुयारी गटार योजनेची वाहिनी टाकली आहे. ते काम संपुष्टातदेखील आले आहे. पावसाआधी नाल्यातील गाळ आणि माती काढणे गरजेचे आहे. मात्र, उल्हासनगर महापालिकेची यंत्रणा ते काम करण्यास पुढाकार घेत नाही. दोन्ही शहरांच्या मध्यभागी नाला असूनही प्रत्येक पावसाच्या आधी अंबरनाथ पालिकाच हा नाला साफ करते. यंदा मात्र नाल्यातच मातीभराव केल्याने कसे काम करावे, हा प्रश्न उपस्थित होत आहे. अंबरनाथ पालिका या नाल्याची स्वच्छता करण्यासाठी पुढाकार घेत असताना उल्हासनगर महापालिकेने नाल्यातील गाळ काढण्यासाठी यंत्रणा लावण्याची गरज आहे.