शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

कल्याण-डोंबिवलीत फेरीवाला कारवाईत दिरंगाई : मनसेचे विरोधी पक्षेनेते मंदार हळबेंची आयुक्त पी.वेलरासू यांना नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2017 12:15 IST

उच्च न्यायालयाने रेल्वे स्थानक परिसरात १५० मीटरपर्यंत फेरीवाल्यांना बसण्यास सक्त मनाई केली आहे. असे आदेश असतांनाही कल्याण-डोंबिवलीत मात्र त्या आदेशांचे सर्रास उल्लंघन होत असून त्यासंदर्भात कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते मंदार हळबे यांनी प्रभागक्षेत्र अधिका-यांवर अवमान याचिका का दाखल करु नये असा इशारा देत आयुक्त पी.वेलरासू यांना नोटीस बजावली आहे.

ठळक मुद्दे विनाविलंब अंमलबजावणी न केल्यास अवमान याचिका १५० मीटरची नियंत्रण रेषा का आखली जात नाही? कल्याण-डोंबिवली दोन्ही शहरांमध्ये फेरीवाले पुन्हा स्थानक परिसरात आढळले

डोंबिवली: उच्च न्यायालयाने रेल्वे स्थानक परिसरात १५० मीटरपर्यंत फेरीवाल्यांना बसण्यास सक्त मनाई केली आहे. असे आदेश असतांनाही कल्याण-डोंबिवलीत मात्र त्या आदेशांचे सर्रास उल्लंघन होत असून त्यासंदर्भात कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते मंदार हळबे यांनी प्रभागक्षेत्र अधिका-यांवर अवमान याचिका का दाखल करु नये असा इशारा देत आयुक्त पी.वेलरासू यांना नोटीस बजावली आहे.वकील समीर तोंडापुरकर यांच्या मार्फत ती नोटीस हळबे यांनी आयुक्तांना बजावली असून महापालिकेने विनाविलंब नियंत्रण रेषा मारायला हव्यात, त्यामुळे फेरीवाल्यांना नेमके कुठे बसायचे ती जागा निश्चित होईल, तसेच त्या जागे व्यतिरीक्त जर कोणी नियमांचे उल्लंघन करत असेल तर अशांवर कठोर कारवाई करण्यासंदर्भात हळबे यांनी मागणी केली आहे. कल्याण-डोंबिवली दोन्ही शहरांमध्ये फेरीवाले पुन्हा स्थानक परिसरात आढळले असून ती संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्याला ठिकठिकाणचे प्रभाग अधिकारी, त्यांचे अतिक्रमण विभागातील कारवाई करणारे पथक आदी जबाबदार असल्याचे हळबे म्हणाले. त्यामुळे जर न्यायालयाच्या आदेशांचा अवमान करायचा असेल तर अवमान याचिका का दाखल करण्यात येऊ नये असा सवाल त्यांनी आयुक्त पी.वेलरासू यांना केला आहे. तसेच त्यांनी रेल्वे प्रशासनाकाही स्मरणपत्र दिले आहे.महापालिकेने न्यायालयाच्याच मार्गदर्शक तत्वांनूसार अद्याप कल्याण-डोंबिवलीत १५० मीटरपर्यंत नियंत्रण रेषा का मारल्या नाहीत, त्यात दिरंगाई का होत आहे असा सवालही त्यांनी केला. एकीकडे कारवाईपण नाही, आणि नियंत्रण रेषापण काढल्या जात नाहीत याबद्दल हळबेंनी तीव्र नाराजी व्यक्त केली.'' महापालिका प्रशासनाने न्यायालयाच्या नीर्देशांनूसार स्थानक परिसरात १५० मीटरवर नियंत्रण रेषा आखावी, तसेच नियमांचे उल्लंघन करणा-या फेरीवाल्यांवर कठोर कारवाई करावी, स्थानक परिसर फेरीवाला मुक्त करावा असे पत्र आयुक्तांना आधीच दिले आहे. त्याची अंमलबजावणी होत नसेल तर सभागृहात त्यासंदर्भात आवाज उठवण्यात येईल.'' - राजेंद्र देवळेकर, महापौर

 

 

 

 

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिकाdombivaliडोंबिवलीkalyanकल्याणthakurliठाकुर्ली