शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

उत्तम फोटोग्राफरसाठी डीएसएलआरला पर्याय नाही...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2020 01:13 IST

मात्र उत्तम फोटोग्राफर होण्यासाठी डीएसएलआर फोटोग्राफीला पर्याय नाही, असे मत फोटोग्राफी क्षेत्रातील तज्ज्ञांनी ‘जागतिक फोटोग्राफी दिना’च्या निमित्ताने व्यक्त केले.

स्नेहा पावसकरठाणे : आज प्रत्येकाच्या हातात मोबाइल आहे. त्या मोबाइलने सेल्फी किंवा फोटो न काढणारा माणूस विरळाच. आपण काढलेले फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आणि त्याला लाइक्स आले की, आपल्याला जणू फोटोग्राफर झालो, असे अनेकांना वाटते. फोटोग्राफीची आवड निर्माण होण्यासाठी मोबाइल फोटोग्राफी हा उत्तम पर्याय आहे; मात्र उत्तम फोटोग्राफर होण्यासाठी डीएसएलआर फोटोग्राफीला पर्याय नाही, असे मत फोटोग्राफी क्षेत्रातील तज्ज्ञांनी ‘जागतिक फोटोग्राफी दिना’च्या निमित्ताने व्यक्त केले.आज प्रत्येक जण मोबाइल घेताना त्याचा कॅमेरा किती मेगापिक्सलचा आहे, ते पाहतात. जास्तीतजास्त चांगल्या दर्जाचा कॅमेरा असणारा मोबाइल घेतला जातो. कोणत्याही छोट्यामोठ्या क्षणांचे फोटो मोबाइलमध्ये टिपले जातात. हे सगळं हातातल्या मोबाइलनं शक्य झालंय. विशेषत: तरुणाई फोटोग्राफीच्या बाबतीत अधिक क्रिएटिव्ह झाली आहे. त्यांचा अवेरनेस वाढलाय. त्यातच मोबाइलमधील अ‍ॅपमुळे फोटो एडिट करून कोलाज, डिझाइनही होतात. एक चांगला फोटोग्राफर घडण्याची ही सुरुवात असू शकते; पण म्हणून मोबाइल फोटोग्राफी ही टेक्नोलॉजीच्या पातळीवर टिकत नाही. मोबाइल फोटोग्राफीला काही मर्यादा आहेत.मोबाइलवर गुळगुळीत, क्लिअर दिसणारा फोटो प्रिंट झाल्यावर मात्र तितका क्लिअर येत नाही, हे वास्तव आहे. मोबाइल फोटोग्राफीमुळे अनेकांना आपण चांगले फोटोग्राफर आहोत किंवा होऊ शकतो असे वाटू लागल्याने गेल्या काही वर्षांत फोटोग्राफर म्हणून करिअर घडवू पाहणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. मात्र याच मोबाइल फोटोग्राफीमुळे फोटो प्रिंट होण्याचे प्रमाण प्रचंड कमी झाले आहे.पूर्वी छोट्यामोठ्या सोहळ्यांचेही फोटो काढून ते अल्बम केले जायचे; मात्र आता काही जण तर लग्नाचे फोटोही प्रिंट करीत नाहीत, याचा परिणाम आमच्या व्यवसायावर झाल्याचे मत युवा फोटोग्राफी कलादिग्दर्शिका अर्चना देशपांडे-जोशी यांनी व्यक्त केले.>कोरोनाकाळात फोटोसेशनही झाले आॅनलाइनकोरोनाच्या काळात सगळ्यांचे उद्योगव्यवसाय बुडालेत. सण-उत्सव, समारंभ नसल्याने फोटोग्राफरचीही तीच परिस्थिती आहे. यावर उपाय शोधून काढत अर्चना देशपांडे-जोशी यांनी आॅनलाइन फोटोसेशन केले आहे. फोटोसेशनची आॅर्डर असली तरी इच्छुकांच्या घरी किंवा इतर कुठे जाता येत नसल्याने त्यांनी फोटो काढू इच्छिणाºया महिलेला फोटोच्या थीमनुसार घरी सेटिंग करायला सांगितली आणि कॅमेरा आॅन करून आॅनलाइन फोटोग्राफी केली. आपल्याप्रमाणेच इतरही अनेक फोटोग्राफरनी यानुसार आॅनलाइन फोटोसेशन केल्याचेही त्यांनी सांगितले.