शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात पावसाची रिपरिप; झाडे कोसळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2020 01:00 IST

घोडबंदर रोडवर भाजीपाल्याचा ट्रक उलटला

ठाणे : घोडबंदर रोडवरील पातलीपाडा उड्डाणपुलाजवळ बंगळुरूहून गुजरातकडे जाणारा भाजीपाल्याने भरलेला ट्रक मध्यरात्री २.३० च्या सुमारास उलटला. यातील चालकासह चौघे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना कळवा रुग्णालयात दाखल केले आहे. दरम्यान, मंगळवारी जिल्ह्यात ठिकठिकाणी पावसाच्या सरी पडल्या.ट्रक दुर्घटनेतील चालक मोहम्मद वारिस (३०) याच्या डोक्याला व कंबरेला गंभीर दुखापत झाली. सहप्रवासी जाकीर हुसेन (४८) याच्या डोक्याला, इम्तियाज गफूर (२३) आणि मोहम्मद युसूफ अली (४५) या दोघांच्या हातापायाला किरकोळ दुखापत झाली आहे. उपचारासाठी त्यांना कळवा रुग्णालयात दाखल केले आहे. मानपाडा चितळसर पोलीस पुढील तपास करीत आहेत.दरम्यान, ठाणे शहरातील सरस्वती हायस्कूलजवळ एक झाड पडून पाच कारचे नुकसान झाले. या ठिकाणी किरकोळ आगीची घटनाही घडली. मुंब्रा येथील शंकर मंदिराजवळ एक झाड आणि नौपाड्यातील एक झाड धोकादायक स्थितीत आहे.बारवी धरणात २७ मिमी पाऊसबारवी धरणात २४ तासांत २७ मिमी पाऊस पडला आहे. या धरणातील खानिवरे, कान्होळ, पाटोळ या पाणलोट क्षेत्रातही कमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. सध्या या धरणाची पाणीपातळी ६५.८५ घनमीटर असून ५६.५९ टक्के पाणीसाठा तयार झाला आहे. गेल्या वर्षी ९८.९२ टक्के पाणीसाठा होता. आंध्र धरणात काही दिवसांच्या तुलनेत ३२ मिमी, भातसा ४४ मिमी, मोडक सागरमध्ये ६१, तानसात ४४ मिमी, तर मध्यवैतरणातही कमी पाऊस पडला आहे.जिल्ह्यात दिवसभरात श्रावण सरी कोसळल्या. दिवसभरात सरासरी २५.८ मिमी पाऊस पडला. यामध्ये ठाणे परिसरात २१, कल्याणला १७.९, मुरबाड ४७.८, भिवंडीला १२, शहापूरला ३५.५, उल्हासनगर २४ आणि अंबरनाथला २२ मिमी कमी पाऊस पडला आहे.