शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

एक्स्प्रेस गाड्या वळवल्या मध्य रेल्वेच्या एक नंबर पटरीवरून, अपघात होण्याची भीती

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2017 14:31 IST

ठाणे : फास्ट ट्रॅकच्या दोन्ही लाईन (पटरी) च्या दुरुस्तीचे काम सुरू असल्यामुळे या लाईनवरील दोन्ही मार्गांच्या अप अन् डाऊनच्या प्रवासी एक्स्प्रेस व मेल गाड्या मध्य रेल्वेकडून स्लो ट्रॅक म्हणजे धीम्या गतीच्या नंबर एक व दोन नंबरच्या पटरीवरून चालवण्यात येत आहेत.

ठाणे : फास्ट ट्रॅकच्या दोन्ही लाईन (पटरी) च्या दुरुस्तीचे काम सुरू असल्यामुळे या लाईनवरील दोन्ही मार्गांच्या अप अन् डाऊनच्या प्रवासी एक्स्प्रेस व मेल गाड्या मध्य रेल्वेकडून स्लो ट्रॅक म्हणजे धीम्या गतीच्या नंबर एक व दोन नंबरच्या पटरीवरून चालवण्यात येत आहेत. आता डाऊन प्रवासी गाड्यांची वाहतूक स्लो ट्रॅकवरून सुरू आहे.या दोन्ही लाईनवरून धावणाऱ्या या गाड्यांचा स्पीड अधिक असल्यामुळे त्या क्षणार्धात येतात. यास अनुसरून या दोन्ही लाईनवरून ये-जा करू नये, अशी सूचना रेल्वेकडून दिली जात आहे. याचे गांभीर्य लक्षात घेऊन प्रवाशांसह पटरी लगतच्या झोपडपट्टीतील रहिवाशांनी लाईनजवळ रेंगाळू नये. यामुळे संभाव्य अपघात टाळणे शक्य होईल, असे जाणकारांकडून सांगितले जात आहे.मुंबई, ठाणे, कल्याण परिसरातील मध्य रेल्वे लाईनच्या दोन्ही बाजूला झोपडपट्ट्या आहेत. रविवार सुटीचा दिवस असल्यामुळे या परिसरात पाहुण्यांची ये-जा सुरू असते. घरं लहान असल्याने पटरीलगतच्या सावलीत गप्पा-टप्पा रंगतात, त्यात मुलांना शाळेची सुटी असल्यामुळे ते अधिक काळ या पटरींच्या जवळपास रेंगाळत आहेत.भरधाव वेगाने येणाऱ्या मेल गाड्यांचा अंदाज येत नाही, यामुळे या परिसरातील संभाव्य धोके लक्षात घेऊन मध्य रेल्वेने देखील उपाययोजना करणे अपेक्षित असल्याचे बोलले जात आहे. रेल्वे स्टेशनवर गाडी येत असल्याचे सूचित होत आहे. पण लोकांची वर्दळ असलेल्या ठिकठिकाणी आज उपाय योजनेची गरज आहे. फ्लॅटफॉर्मवर देखील प्रवाशांची गर्दी आहे. त्याचा ताण जुन्या व अरुंद पुलांवर होऊ नये, यासाठी सुरक्षा गार्ड तैनात करण्याची गरज आहे. एलफिन्स्टनच्या घटनेनंतर काही दिवस गार्ड तैनात केले होते. पण आता ते नसल्याचे दिसून येत आहे.

टॅग्स :Railway Passengerरेल्वे प्रवासी