शहरं
Join us  
Trending Stories
1
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
3
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
4
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
5
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
6
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
7
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
8
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
9
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
10
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
11
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
12
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
13
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
14
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
15
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
16
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
17
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
18
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
19
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
20
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
Daily Top 2Weekly Top 5

रांजनोली नाक्यावरील ‘वसुली’ने वाहनचालक त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2020 00:07 IST

भिवंडीतील वाहतूककोंडीकडे दुर्लक्ष

-  नितीन पंडितभिवंडी : शहरातील वाहतूककोंडीची समस्या गंभीर झाली असताना वाहन चौकशीच्या नावाने ‘वसुली’ करण्याची मोहीम वाहतूक पोलीस विभागाकडून भिवंडी बायपास येथील रांजनोली नाक्यावर सुरू असल्याचा आरोप वाहनचालक, मालक करीत आहेत. चौकशीच्या निमित्ताने वाहने अडवून गाडीच्या कागदपत्रांची मागणी करून कागदपत्रांमध्ये त्रुटी आढळल्यास चक्क दोनशे ते पाचशे रुपयांपर्यंत पैशांची मागणी वाहतूक पोलिसांकडून केली जात असल्याची वाहन चालकांची तक्रार आहे.कोरोना संकटानंतर हळूहळू वाहन चालक आपल्या दीर्घकाळ घराखाली उभ्या ठेवलेल्या मोटारी रस्त्यावर आणत आहेत. अनेकांना आपल्या गाडीची पीयूसी व इंशुरन्स काढता आला नसल्याने अशा वाहन चालकांकडून येथे २ हजार ४०० रुपयांची पावती फाडण्याची भीती दाखवून बेकायदा वसुली केली जात असल्याचे चालकांचे म्हणणे आहे.कल्याण नाका ते भिवंडी परिमंडळ दोनचे पोलीस उपायुक्त यांच्या कार्यालयापर्यंत नेहमीच वाहतूककोंडी होत असते. पोलीस अधिकाऱ्यांनादेखील या वाहतूककोंडीचा त्रास सहन करावा लागतो. मात्र ही वाहतूककोंडी सोडविण्यासाठी वाहतूक पोलिसांची कमतरता असल्याचे सांगत कोंडी सोडविण्यासाठी ट्राफिक वॉर्डनची मदत घेतली जात असताना रांजणोली नाक्यावर पंधरा ते वीस वाहतूक पोलिसांचा जथ्था वाहन चौकशीसाठी नेहमी तैनात असतो. एवढ्या मोठ्या संख्येने वाहतूक पोलीस एकाच ठिकाणी का जमा असतात, असा वाहन चालकांचा सवाल आहे. नागरिकांची या ‘वसुली’तून सुटका संबंधित अधिकारी करतील का, याकडे वाहन चालकांचे लक्ष लागले आहे.वाहतूक नियमांचे पालन व्हावे व वाहतूक विभागाचा धाक राहावा यासाठी रुटीन चेकिंग करण्यात येते. मात्र जर पैसे वसुली होत असेल तर निश्चितच चौकशी करण्यात येईल.    - अशोक थोरात, पोलीस निरीक्षकशहरात वाहतूककोंडीची समस्या गंभीर असताना वाहतूक पोलिसांकडून घडणारा हा प्रकार गंभीर असून यासंदर्भात वाहतूक पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील यांच्याशी बोलणार आहेत.     - योगेश चव्हाण, पोलीस उपायुक्तया प्रकाराची गंभीर दखल घेऊन चौकशी करू. दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल.     - बाळासाहेब पाटील, उपायुक्त,     वाहतूक विभागयासंदर्भात ठाणे पोलीस आयुक्तांशी चर्चा करणार असून, लवकरच हा प्रश्न मार्गी लावणार आहे.    - रईस शेख, आमदार, भिवंडी पूर्व