शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
3
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
4
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
5
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
6
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
7
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
8
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
9
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
10
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
11
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
12
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
13
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
14
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
15
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
16
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
17
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
18
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
19
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
20
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
Daily Top 2Weekly Top 5

काँक्रिटीकरणाचा चालकांना फटका, खड्डे, धुळीतून काढावी लागते वाट

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2018 01:16 IST

ठाकुर्ली पूर्व-पश्चिम भागाला जोडणाऱ्या उड्डाणपुलामुळे वाहनांची वर्दळ वाढली असताना पश्चिमेला बावनचाळीत पुलानजीक असलेल्या दोन रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाचे काम रेल्वेने हाती घेतले आहे.

डोंबिवली : ठाकुर्ली पूर्व-पश्चिम भागाला जोडणाऱ्या उड्डाणपुलामुळे वाहनांची वर्दळ वाढली असताना पश्चिमेला बावनचाळीत पुलानजीक असलेल्या दोन रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाचे काम रेल्वेने हाती घेतले आहे. त्यातील एका रस्त्याचे काम अंतिम टप्प्यात असताना दुस-या रस्त्याचे काम सुरू केले आहे. या ढिसाळ नियोजनामुळे खड्डे आणि धुळीच्या रस्त्यावरून वाहनचालकांना वाहने न्यावी लागत आहेत. त्यामुळे त्यांची कसरत होत आहे.ठाकुर्ली उड्डाणपुलाचे काम ऑक्टोबर २०१६ मध्ये सुरू करण्यात आले. पूर्वेला स. वा. जोशी हायस्कूलकडे उतरणा-या मार्गाचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे पूल मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात वाहनांसाठी खुला करण्यात आला. तर, ठाकुर्ली रेल्वे स्थानकाच्या बाजूकडील पुलाचा दुसरा टप्पा अद्याप पूर्ण व्हायचा आहे.उड्डाणपुलामुळे पश्चिमेतील परिसराच्या विकासाला चालना मिळाली. तेथील खड्डेमय रस्ते सुस्थितीत येण्यास सुरुवात झाली. प्रारंभी या परिसरातील रस्त्यांना डांबरीकरणाचा साज चढवला होता. पावसाळ्यात खड्डे पडल्याने वाहनचालकांचा त्रास कायम राहिला. त्यामुळे काँक्रिटीकरण करावे, अशी मागणी होत होती. त्याची दखल घेत रेल्वे प्रशासनाने रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाची कामे सध्या सुरू केली आहेत. परंतु, योग्य प्रकारे नियोजन नसल्याने या कामांचा वाहनचालकांना चांगलाच फटका बसत आहे. त्यामुळे पुलावरून उतरल्यावर बावनचाळ, राजू नगर, गणेश नगर, नवापाडा आणि चिंचोड्याचा पाडा येथे जाणाºया आणि तेथून पुलाकडे येणाºया वाहनचालकांना व पादचाºयांना चिंचोळ्या अशा खड्डेमय तसेच धुळीच्या रस्त्यांवरून वाट काढावी लागत आहे.>रस्ता अर्धवट स्थितीत बंद केल्याने संभ्रमपुलाच्या परिसरातील दोन रस्त्यांपैकी एका रस्त्याचे काम पूर्णत्वाला आले आहे. हा रस्ता वाहतुकीसाठी सुरू करून अन्य रस्त्यांचे काम हाती घेणे आवश्यक होते. पुलाजवळील उजवीकडे जाणारा रस्ताही पुढच्या बाजूस खोदायला घेतल्याने सध्या तो वाहतुकीसाठी बंद आहे. त्याची सूचनाही लावली आहे. पण तो रस्ता अर्धवट स्थितीत बंद केल्याने वाहनचालकांमध्ये संभ्रम निर्माण होत आहे. पुढे जाऊन पुन्हा माघारी वाहन वळवावे लागत आहे.