शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

चालकाचे अपहरण करून कार पळवली, तिघांवर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2017 01:08 IST

चाकूच्या धाकावर चालकाचे अपहरण करून कार चोरल्याची घटना सोमवारी ठाण्यात घडली. हातपाय बांधलेल्या अवस्थेत आरोपींनी चालकास पुण्याजवळ कारबाहेर ढकलले होते.

ठाणे : चाकूच्या धाकावर चालकाचे अपहरण करून कार चोरल्याची घटना सोमवारी ठाण्यात घडली. हातपाय बांधलेल्या अवस्थेत आरोपींनी चालकास पुण्याजवळ कारबाहेर ढकलले होते.ठाण्यातील मानपाड्यात राहणारे ३१ वर्षीय मुरूगन वेदमुत्तू नाडार हे बदली चालक म्हणून गत १० दिवसांपासून वृंदावन सोसायटी येथील सुरेश सुब्रमणीयम यांच्याकडे कामाला होते. ३० आॅक्टोबर रोजी रात्री ८ वाजताच्या सुमारास काम आटोपून घरी जात असताना मालकाची पत्नी चित्रा यांनी फोन करून त्यांना डॉक्टरकडे जायचे असल्याचे सांगितले. त्यानुसार, चालकाने पुन्हा घरी जाऊन चित्रा यांना रात्री ९ वाजताच्या सुमारास कारने हिरानंदानी मिडोस येथील एका स्त्रीरोगतज्ज्ञाकडे नेले. चित्रा क्लिनिकमध्ये गेल्या असताना चालक कारमध्ये मोबाइलवर चॅटिंग करत होते. त्याच वेळी २५ ते ३० वर्षे वयोगटातील तीन युवक कारमध्ये घुसले आणि त्यांनी चालकाला मागच्या सीटवर ओढले. गळ्याला चाकू लावून आरडाओरड न करण्याची धमकी दिली. आरोपींनी चालकाच्या तोंडाला चिकटपट्टी लावली. दोन्ही हात आणि पायही बांधले. वाटेत एका पेट्रोलपंपावर आरोपींनी कारमध्ये इंधन भरले. काही तासांनी पुण्यातील आळेफाटा येथे आरोपींनी चालकास कारमधून ढकलून दिले. आरोपी कार घेऊन पळून गेल्यानंतर चालकाने हात सोडवण्यासाठी एका मोटारसायकलस्वाराची मदत घेतली. या मोटारसायकलस्वाराने चालकास आळेफाटा पोलीस ठाण्यात सोडले. पोलिसांना घटनेची माहिती दिल्यानंतर चालक एका टेम्पोने ठाण्यात पोहोचला. आरोपींनी आपला मोबाइल फोन आणि ३०० रुपये रोख घेतले असल्याचे चालकाने तक्रारीत म्हटले आहे. चितळसर पोलिसांनी या प्रकरणी मंगळवारी रात्री तीन अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला. हिरानंदानी मिडोसमधील सीसी कॅमेºयाचे फूटेज पोलिसांनी तपासले. मात्र, त्यातून काही स्पष्ट होत नसल्याचे चितळसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणपत पिंगळे यांनी सांगितले.आरोपींचे संभाषण संशयास्पदठाणे ते पुणेदरम्यानच्या प्रवासादरम्यान आरोपींचे आपसातील संभाषण चालकाने ऐकले. त्यानुसार, आरोपींनी एकाला मारले असून पोलीस त्यांच्या मागावर असल्याचे चालकास समजले. चालकाने यासंदर्भात पोलिसांना माहिती दिली असून, त्या दिशेनेही तपास सुरू आहे.

टॅग्स :Crimeगुन्हा