शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

वरसावे पुलाच्या वाहतूककोंडीचा चाकरमानी, विद्यार्थ्यांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2018 23:52 IST

कृत्रिम पाणीटंचाई : पाण्याचे टँकरही झाले मिळेनासे, दोनपैकी एकच मार्गिका सुरू

- राजू काळे भाईंदर : मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील नवीन पुलाच्या दुरुस्तीसाठी ७ डिसेंबरपासून पुलावरील दोनपैकी एकच मार्गिका हलक्या वाहनांसाठी सुरू ठेवण्यात आली आहे. त्यामुळे पुलाच्या वसई-विरार क्षेत्रातील बाजुकडे मोठ्याप्रमाणात वाहतूककोंडी होऊ लागल्याने स्थानिक चाकरमानी, विद्यार्थ्यांना विलंबाचा फटका बसू लागला आहे. अशातच पाण्याचे टँकरही मिळेनासे झाल्याने परिसरात पाण्याची कृत्रिम टंचाई निर्माण झाली आहे.भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (एनएचएआय) २००२ मध्ये वरसावे येथील घोडबंदर नदीवर बांधलेल्या पुलाच्या दोन स्प्रींग बदलण्यासाठी ७ डिसेंबरपासून पुलावरील अवजड वाहतूक बंद केली आहे. या पुलावरील दोनपैकी एक मार्गिका हलक्या वाहनांसाठी सुरू ठेवली आहे. त्याच्यालगत असलेल्या जुन्या पुलावरील मुंबईकडून येणारी वाहतूक सुरू ठेवल्याने मीरा-भाईंदर क्षेत्रातील वरसावे वाहतूक बेटावर वाहतूक कोंडीचा त्रास तुलनेने कमी असल्याचे सांगण्यात येत आहे. याउलट पूलाच्या दुसऱ्या टोकावर प्रचंड प्रमाणात वाहतूककोंडी निर्माण झाल्याने ती सुमारे ५ किलोमीटर अंतरावर असलेल्या मालजीपाड्यापर्यंत वाढली आहे. याचा जास्त फटका तेथील स्थानिकांना बसू लागला आहे. येथील चाकरमान्यांना मीरा-भाईंदरसह ठाणे व मुंबई येथे नोकरीसाठी जावे लागते. विद्यार्थ्यांना मीरा-भार्इंदर क्षेत्रातील शाळांमध्ये यावे लागते. येथील लोकांना मीरा-भार्इंदर शहर सोईचे ठरते. त्यामुळे येथील विद्यार्थी मीरा-भाईंदरमधील शाळा व महाविद्यालयांत शिकण्यासाठी येतात. येथील अनेक कुटुंबांना पाण्यासाठी नळजोडणी नसल्याने त्यांना वसई-विरार क्षेत्रातील मालजीपाडा तर मीरा-भाईंदर येथील काशिमीरा परिसरातून पाण्याचे टँकर मागवावे लागतात. मालजीपाडा येथून टँकर पोहोचण्यास किमान ४ ते ५ तास लागत असल्याने पूर्वी येणारे टँकर वाहतूककोंडीमुळे येईनासे झाले आहेत. काशिमीरा येथून येणाºया टँकरला वाहतूककोंडीचा फटका बसत नसला तरी परत जाताना मात्र कोंडीत अडकून पडावे लागते. त्यामुळे तेथील टँकरसुद्धा बंद करण्यात आल्याने पाण्याची कृत्रिम टंचाई निर्माण झाली आहे. येथील अनेकांचा ट्रान्सपोर्टचा व्यवसाय असल्याने पुलाच्या दुरुस्तीपुर्वी त्यांची वाहने मुंबई, ठाणे येथे दररोज तीन ते चार फेºया करीत होते. कोंडीमुळे एकच फेरी होत असल्याने त्यांच्या व्यवसायावर परिणाम होतो आहे.पुलाची दुरुस्ती लवकर पूर्ण करुन स्थानिकांना दिलासा द्यावा. तत्पूर्वी उद्भवलेल्या वाहतूककोंडीतून किमान स्थानिक विद्यार्थ्यांच्या बस तसेच पाण्याच्या टँकरला प्राधान्य दिले जावे. अनेक लोकं पुलावरुनच पायपीट करु लागले असून रात्रीच्या वेळी पूलावर अंधार असल्याने त्यांच्या जिवीताला धोका होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे पुलावर पुरेशा उजेडाचे दिवे बसविले जावेत.- राजेंद्र ठाकूर, समाजसेवकवसई-विरार क्षेत्रातील पुलाच्या बाजूकडील बहुतांश विद्यार्थी आपल्या शाळेत येतात. त्यांना वाहतूककोंडीमुळे विलंब होऊ लागला आहे. वाहतूककोंडी सुसह्ण होण्यासाठी सरकारी यंत्रणेकडे सतत पाठपुरावा केला जात असून, त्यावर सकारात्मक कारवाई होत नाही.- केशव घरत, संस्थापक, राजा शिवाजी विद्यालय, मीरा-भाईंदर‘आयआरबी’च्याविरोधात श्रमजीवीचे सोमवारी आंदोलनमीरा रोड : नवीन वरसावे पुलाच्या दुरु स्तीचे काम सुरू झाले. अपेक्षेप्रमाणे तेथे वाहतूककोंडी होत आहे. पण ही कोंडी, पोलिसांवरचा अतिरिक्त ताण तसेच इंधन आणि वेळेचा अपव्यय याला आयआरबी जबाबदार असल्याचा ठपका ठेवत श्रमजीवी संघटनेचे संस्थापक विवेक पंडित यांनी सोमवारी महामार्ग प्राधिकरणाच्या वरसावे येथील कार्यालयावर आंदोलन करणार असल्याचे कळवले आहे. दीड वर्षांपासून वरसावे नवीन पुलाच्या दुरुस्तीचे काम टोलवले जात आहे. दुरुस्ती महत्त्वाची असतानाही शासन यंत्रणा गंभीर नसल्याचा सूर आहे. अखेर शुक्र वारपासून दुरु स्ती सुरु झाल्याने अवजड वाहने मनोर व चिंचोटी येथून भिवंडी मार्गे वळवली आहेत. लहान वाहने नवीन पुलावरील एकेरी मार्गिकेतून सोडली जात आहे. सदर महामार्ग वर्दळीचा असल्याने ठिकठिकाणी कोंडी सुरु झाली आहे. वरसावे येथे तर वसईच्या दिशेने ३ ते ४ किमी रांगा लागत आहेत. वाहतूक कोंडी, पोलिसांवर पडणारा अतिरिक्त ताण, वाया जाणारी वेळ व इंधन याला आयआरबी जबाबदार असल्याचे सांगत नागरिकांना त्रास होतो म्हणून वरसावे येथील महामार्ग प्राधिकरणाच्या कार्यालयाबाहेर सकाळी ११ वा. आंदोलन करणार असल्याचे पत्र पंडित यांनी पोलिसांसह संबंधितांना दिले.

टॅग्स :water shortageपाणीटंचाईTrafficवाहतूक कोंडीbhayandarभाइंदर