शहरं
Join us  
Trending Stories
1
४ तासांची भेट, एकाच खोलीतून ७००० अणुबॉम्बवर नियंत्रण; पुतिन-ट्रम्प भेटीत हायटेक सुरक्षा
2
Agni-6 Missile : मोठी तयारी! अग्नि-६ क्षेपणास्त्र किती धोकादायक? भारत चाचणी करू शकतो, २ दिवसांचा नोटम जारी
3
पालघर: मालवाहू जहाजाची मासेमारी करणाऱ्या बोटीला धडक, चार मच्छिमार पडले समुद्रात; 15 मच्छिमारांना कुणी आणले किनाऱ्यावर?
4
बुलढाणा: जलसमाधी आंदोलन करायला गेले अन् आंदोलकच गेला वाहून; अधिकाऱ्यांसोबत कशावरून झाली बाचाबाची?
5
कोट्यवधीची रोकड, ६.७ किलो सोनं आणि..., काँग्रेसच्या आमदाराकडे सापडलं घबाड, EDची कारवाई   
6
हुमायूं मकबऱ्यात भिंत कोसळली, ७-८ जण दबले; मदत कार्य सुरू; व्हिडीओ आला समोर
7
'अमरीका ने कुत्ते पाले, वर्दी वाले-वर्दी वाले', पीओके मध्ये पाकिस्तान लष्कर प्रमुखांविरोधात घोषणा; व्हिडीओ व्हायरल
8
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
9
डोनाल्ड ट्रम्प भेटीपूर्वी व्लादिमीर पुतिन यांचा झटका; ४१५ कोटींचं लढाऊ विमान 'गायब'? 
10
ज्या चित्रपट निर्मात्याला राखी बांधली, पुढे त्याचीच पत्नी बनली ही अभिनेत्री, लग्नापूर्वीच...    
11
"भटक्या कुत्र्यांना शेल्टर होममध्ये ठेवल्याने प्रश्न सुटणार नाही, तर..."; सरसंघचालक भागवतांनी काय सुचवला पर्याय?
12
VIDEO: जय महाकाल !! आशिया कपआधी गौतम गंभीर सहकुटुंब महाकालेश्वराच्या चरणी, भस्म आरतीही केली!
13
महिला अधिकारी तुरुंगात गुंडाशी फोनवर अश्लील बोलायची, पत्रेही सापडली; धक्कादायक माहिती उघड
14
विधानसभेच्या नो पार्किंगमध्ये उभी होती मंत्र्यांची कार, वाहतूक पोलिसांनी क्रेन आणली आणि...
15
बेपत्ता अर्चनाला शोधण्यासाठी पोलिसांना नवा प्लॅन; ८ दिवसांपासून ती गायब, ६ टीम अलर्ट
16
'तारीख-वार तुम्ही ठरवा, मी यायला तयार...'; बागेश्वर बाबाने स्वीकारलं अखिलेश यादवंचे 'चॅलेंज'
17
Krishna Janmashtami 2025: टीव्हीवर बालकृष्णाची भूमिका साकारणारी चिमुरडी आता दिसते खूप वेगळी, सध्या ती काय करते?
18
भारताच्या स्वातंत्र्याने खलिस्तान्यांना होतोय त्रास; ऑस्ट्रेलियाच्या रस्त्यांवर गोंधळ घातला
19
ठाकरे बंधूंच्या पॅनेलला टक्कर देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी २ शिलेदारांवर सोपवली जबाबदारी
20
पाकिस्तानमध्ये हाहाकार! ढगफुटी, पूर आणि भूस्खलनात ४१ लोकांचा मृत्यू, असंख्य बेपत्ता; पाचशे पर्यटक अडकले

कल्याणच्या सखल भागांत साचले पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2019 00:03 IST

नागरिकांमध्ये धास्ती कायम; खाडीलगत भरतीमुळे वाढली पाण्याची पातळी

कल्याण : कल्याण-डोंबिवली परिसरात २६ आणि २७ जुलैला झालेल्या मुसळधार पावसामुळे आलेल्या पुरातून नागरिक सावरत असतानाच पुन्हा शुक्रवार आणि शनिवारी धुवाधार पाऊस बरसला. त्यामुळे सखल भागातील नागरिकांनी पुन्हा पावसाची धास्ती घेतली. पावसाचे पाणी सकाळी ठिकठिकाणी शिरले होते. तसेच खाडीलगतच्या भागात भरतीच्या वेळी पाण्याची पातळी वाढल्याने नागरिकांनी चिंता व्यक्त केली.पावसाने शुक्रवार रात्रीपासूनच जोरदार बॅटिंग सुरू केली होती. त्यामुळे शनिवारी सकाळी कल्याण रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक एक ते तीनच्या रूळांमध्ये पाणी साचले. परिणामी रेल्वेची वाहतूक ठप्प झाली होती. कल्याण पश्चिमेतील शिवाजी चौक, मोहम्मद अली चौक, आंबेडकर रोडवर पाणी साचले होते. पूर्वेतील आडीवली-ढोकळी परिसरातही नाल्याला पूर आल्याने नागरिकांना रस्ता ओलांडता येत नव्हता. वालधुनी व उल्हास नदीच्या पाण्याची पातळी वाढली होती. दुपारी पावसाने थोडी उसंत घेतल्याने पावसाचे पाणी ओसरले. मात्र, सायंकाळी भरतीच्या वेळी खाडीनजीक पावसाच्या पाण्याची पातळी वाढू लागल्याने नागरिक भयभीत झाले होते. पुन्हा घरे पाण्याखाली जाणार का, या चिंतेने ते त्रस्त होते. बिर्ला महाविद्यालय परिसरात चाळींमध्ये पाणी शिरले. रहिवाशांनी पाण्याच्या पंप लावून घरातील पाणी काढण्याचा प्रयत्न केला. परंतु, पावसाचा जोर असल्याने त्याचाही काही उपयोग झाला नाही. ऐतिहासिक काळा तलावही भरून वाहत होता. अनुपनगर, घोलपनगरात पाणी साचले. केडीएमसीच्या ‘ड’ प्रभागातील शामा व जीवनछाया या चाळीत पाणी साचले. शिवाजीनगर, वालधुनी परिसर, दावडी, पिसवली परिसरातीही पाणी शिरले.महापालिका आयुक्त गोविंद बोडके आणि उपायुक्त मारुती खोडके यांनी जलमय झालेल्या ठिकाणांची पाहणी केली. तसेच काही नागरिकांच्या जेवणाची व्यवस्था केली. महापालिका हद्दीत सकाळपर्यंत १५० मिमी पाऊस पडला असून आजपर्यंत पडलेल्या पावसाची एकूण नोंद दोन हजार ४५४ मिमी इतकी झाली आहे.कांबा येथील नाला केला अरुंदटिटवाळा : पावसाळ्यात कल्याण-मुरबाड महामार्ग बंद होण्यास कारणीभूत ठरणाऱ्या टाटा पॉवर हाउस कंपनीसमोरील सपना लॉन्स येथील अरुंद नाल्यावर अखेर कांबा ग्रामपंचायतीने शनिवारी कारवाई केली. त्यामुळे नैसर्गिक पाण्याच्या प्रवाहातील अडथळा दूर झाला.कांबा गावातून कल्याण-मुरबाड महामार्ग जातो. या मार्गावर पूर्वीपासून म्हारळ व कांबा टाटा पॉवर हाउस येथे पावसाळ्यात पाणी भरत होते. परंतु, एमएमआरडीएने शहाड ते म्हारळपाडादरम्यान काँक्रिटचा रस्ता बनवून येथील पाण्याचा प्रश्न सोडवला. परंतु, तरीही टाटा पॉवर हाउस येथे पाणी भरत असल्याने हा मार्ग बंद होत आहे. २७ जुलैच्या पावसातही हा रस्ता बंद झाला. शनिवारीही तीच परिस्थिती निर्माण झाली. त्यामुळे अखेर कांबा ग्रामपंचायतीचे सरपंच मंगेश बनकरी, उपसरपंच संपदा बंडू पावशे, सदस्य मदन उबाळे, ग्रामविकास अधिकारी ए.जे. इंगोले, कर्मचारी गुरु नाथ बनकरी आदींनी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी रमेश अवचार, वैद्यकीय अधिकारी डॉ. रामेश्वर मोरे, विस्तार अधिकारी दिनेश घोलप आदींच्या उपस्थितीत हा नाला जेसीबीद्वारे रुंद केला.

टॅग्स :Rainपाऊस