शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

अमरनाथ यात्रेसाठी फिटनेस सर्टिफिकेटचा द्राविडी प्राणायाम, ‘तुघलकी’ निर्णयामुळे यात्रेकरूंना मन:स्ताप

By पंकज पाटील | Updated: April 19, 2023 13:30 IST

Amarnath Yatra :

- पंकज पाटीलअंबरनाथ : अमरनाथ यात्रेला जाणाऱ्या यात्रेकरूंची यंदाच्या वर्षी अडचण होणार आहे. कारण यात्रेसाठी लागणारे मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट देण्याचे अधिकार यंदा एका जिल्ह्यात फक्त एकाच डॉक्टरांना म्हणजे जिल्हा शल्यचिकित्सकांना देण्यात आले आहेत. यापूर्वी तालुका स्तरावरील सरकारी डॉक्टरसुद्धा हे सर्टिफिकेट देऊ शकत होते, त्यामुळे यात्रेकरूंना हे सर्टिफिकेट सहज मिळत होते.  मात्र यंदा हा नवीन नियम आल्याने आता प्रत्येक जिल्ह्यात फक्त सिव्हिल सर्जनला, हे अधिकार असणार आहेत.

अमरनाथ यात्रेला जाणाऱ्या यात्रेकरूंना आधी रजिस्ट्रेशन करावे लागते, मगच यात्रेला जाण्याचे परमिट दिले जाते. हे परमिट देताना आधी सरकारी हॉस्पिटलच्या डॉक्टरांकडून शारीरिकदृष्ट्या यात्रेकरू सक्षम असल्याचा दाखला घ्यावा लागतो. हा दाखला देण्याचे अधिकार मागच्या वर्षीपर्यंत ग्रामीण रुग्णालय, तालुका रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय या ठिकाणच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनासुद्धा होते. मात्र यंदा प्रत्येक जिल्ह्याच्या  जिल्हा शल्यचिकित्सकांनाच हे अधिकार देण्यात आले आहेत.  ठाणे जिल्ह्यात जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कैलास पवार यांना हे अधिकार आहेत. ठाणे जिल्ह्यातून दरवर्षी शेकडो भाविक अमरनाथ यात्रेसाठी जातात.  हा आकडा दरवर्षी वाढतच असतो. यंदाही ही संख्या मोठी असू शकते.

‘मेडिकल सर्टिफिकेटवर नेमकी स्वाक्षरी कोणाची लागणार हे आधीच जाहीर करणे गरजेचे आहे. अमरनाथ यात्रेचे रजिस्ट्रेशन सुरू झाल्यावर आमचा गोंधळ उडत आहे. हजारो अमरनाथ यात्रेकरूंना ठाण्याला जाऊन मेडिकल सर्टिफिकेट घेणे हे अडचणीचे होणार आहे. एवढेच नव्हे तर मुख्य डॉक्टरांना देखील हा प्रकार त्रासदायक ठरणार आहे.- ॲड. महेश शर्मा, अमरनाथ यात्रेकरू

नवीन नियमाबाबत माहितीच नाही?यावर्षी या सर्व भाविकांना ठाण्याला जाऊन आपले मेडिकल सर्टिफिकेट आणावे लागेल, तरच या यात्रेकरूंना अमरनाथ यात्रेला जाण्याचे परमिट मिळेल. ही बाब अतिशय त्रासदायक असून इतक्या यात्रेकरूंची तपासणी करून त्यांना दाखला देणे ही जिल्हा शल्यचिकित्सकांसाठीही डोकेदुखी ठरणार आहे. त्यामुळे पूर्वीप्रमाणे तालुकास्तरावरील सरकारी डॉक्टरांना याबाबतचे अधिकार देण्याची मागणी यात्रेकरूंनी केली आहे. या सगळ्या गोंधळाबाबत ठाणे जिल्ह्याचे सिव्हिल सर्जन डॉ. पवार म्हणाले की, या नवीन नियमांबाबत आपल्याला कोणतीही माहिती नसून सकाळपासून आपल्याला मेडिकल सर्टिफिकेटसाठी अमरनाथ यात्रेकरूंचे अखंड फोन येत आहेत.

टॅग्स :Amarnath Yatraअमरनाथ यात्राthaneठाणे