शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

डॉ. बाबासाहेबांचा पुतळा कधी?, रिपाइंचे उद्या उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2017 23:42 IST

वारंवार मागणी आणि आंदोलन छेडूनही भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यास केडीएमसीला अजूनही मुहूर्त मिळालेला नाही.

डोंबिवली : वारंवार मागणी आणि आंदोलन छेडूनही भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यास केडीएमसीला अजूनही मुहूर्त मिळालेला नाही. त्याच्या निषेधार्थ ६ डिसेंबर या बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनाचे निमित्त साधत मंगळवार, ५ डिसेंबरला रिपब्लिकन पक्षातर्फे (आठवले गट) लाक्षणिक उपोषण छेडले जाणार आहे. ठोस कृती न झाल्यास तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा पक्षाने दिला आहे. यासंदर्भात त्यांनी आयुक्त पी. वेलरासू यांना पत्रही दिले आहे.डोंबिवलीत बाबासाहेबांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्याची मागणी १५ ते २० वर्षांपासून होत आहे. यासंदर्भात केडीएमसीच्या महासभेत ठराव मंजूरही झाला आहे. केडीएमसीच्या डोंबिवली विभागीय कार्यालयाच्या आवारात हा पूर्णाकृती पुतळा उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. परंतु, याला अजूनही मुहूर्त मिळालेला नाही. त्यातच, येथील महापालिकेच्या वास्तूचे स्थलांतर होणार असल्याने येथे पुतळा उभारण्यात येणार की नाही, याबाबत साशंकता व्यक्त होत आहे.दरम्यान, रिपाइंने पुन्हा महापालिका आयुक्तांना पत्र पाठवून पूर्णाकृती पुतळा उभारण्याची मागणी केली आहे. मात्र, आतापर्यंत झालेल्या दिरंगाईचा निषेध म्हणून मंगळवारी लाक्षणिक उपोषण छेडले जाणार आहे. पूर्णाकृती पुतळ्याचा मुद्दा तसेच अन्य प्रलंबित मागण्यांसंदर्भात ठोस निर्णय घ्या, अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा रिपाइंचे शहराध्यक्ष अंकुश गायकवाड यांनी आॅगस्टमध्ये एका पत्रकार परिषदेत दिला होता. आता बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या आधी लाक्षणिक उपोषणाचा पवित्रा घेतला गेल्याने वेलरासू कोणती भूमिका घेतात, याकडे लक्ष लागले आहे.बाबासाहेबांचा पूर्णाकृती पुतळा उभारावा, यासाठी बरीच आंदोलने झाली आहेत. परंतु, आम्हाला प्रत्येक वेळेस आश्वासन देऊन गप्प बसवण्यात येते. आजपर्यंत दिशाभूल करण्यात आली आहे. आता गप्प राहणे जमणार नाही. त्यासाठी मंगळवार, ५ डिसेंबरला सकाळी ११ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत लाक्षणिक उपोषण छेडण्याचा निर्णय घेतला आहे. या वेळी ठोस कृती न झाल्यास तीव्र आंदोलन छेडू, असे अंकुश गायकवाड यांनी वेलरासू यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे.