शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
3
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
4
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
5
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
6
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
7
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
8
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
9
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
10
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
11
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
12
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
13
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
14
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
15
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
17
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
18
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
19
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
20
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
Daily Top 2Weekly Top 5

डॉ. पायल तडवी प्रकरणा संदर्भात श्रमजीवीच्या युवतींचे ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2019 20:42 IST

जिल्ह्यातील आदिवासी, दलित युवती येथील जांभळी नाका येथे एक येऊन त्यांनी दुपारी हा धडक मोर्चा काढला. या युवती टेंभी नाका, सिव्हील रूग्णालय, सेंट्रल मैदान या मार्गाने येथील शासकीय विश्रामगृहाजवळ हा मोर्चा आडवण्यात आला. या मोर्चाचे सभेत रूपांतर होऊन महिला ठिणगीच्या या युवतींना शासनास सज्जड दम देत सुरक्षेची जोरदार मागणी केली.

ठळक मुद्देठाणे जिल्हाधिकारी कार्यालयावर पोस्टर, बॅनर घेऊन धडक मोर्चा जातीयवादी आरापींचा यावेळी निषेध करून त्यांच्यावर गुन्हे दालख करण्याची मागणीडॉ. तडवी यांची आत्महत्या नसून जातीयतेचा हा बळी आहे.

ठाणे : मुंबईच्या नायर रूग्णालयातील डॉक्टर पायल तडवी आत्महत्या प्रकरणी श्रमजीवीेच्या महिला ठिणगी कार्यकत्या युवतींनी मंगळवारी ठाणेजिल्हाधिकारी कार्यालयावर पोस्टर, बॅनर घेऊन धडक मोर्चा काढून तीव्र निदर्शने केली. या आत्महत्येस कारणीभूत ठरलेल्या डॉक्टरांवर कडक करवाई करून त्यांना वेळीच निलंबीत करावे, त्यांच्यावर अ‍ॅट्रॉसिटीखाली गुन्हे दाखल करण्याची मागणी ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांना दिलेल्य निवेदनात केलीजिल्ह्यातील आदिवासी, दलित युवती येथील जांभळी नाका येथे एक येऊन त्यांनी दुपारी हा धडक मोर्चा काढला. या युवती टेंभी नाका, सिव्हील रूग्णालय, सेंट्रल मैदान या मार्गाने येथील शासकीय विश्रामगृहाजवळ हा मोर्चा आडवण्यात आला. या मोर्चाचे सभेत रूपांतर होऊन महिला ठिणगीच्या या युवतींना शासनास सज्जड दम देत सुरक्षेची जोरदार मागणी केली. डॉ. तडवी यांची आत्महत्या नसून जातीयतेचा हा बळी आहे. त्या आदिवासी असल्याचे माहीत असूनही त्यांना जाणीवपूर्वक सार्वजनिक ठिकाणी पानउतार करणे, अपमानीत करणे आदी कृत्य करण्यात आल्याचे या युवतींनी यावेळी स्पष्ट केले.या जातीयतेच्या छळवणुकीतूनच डॉ. तडवी यांना आत्महत्या करावी लागली आहे. यास कारणीभूत असलेल्या जातीयवादी आरापींचा यावेळी निषेध करून त्यांच्यावर गुन्हे दालख करण्याची मागणी युवतीं केली. याशिवाय आरोपी डॉ. हेमा आहुजा, डॉ. महिरे, डॉ. खंडेलवाल यांच्यावर अ‍ॅट्रॉसिटीखाली गुन्हे दाखल करा, त्यांना तत्काळ अटक करा, त्यांची डॉक्टर पदवी काढून घ्या, आदिवासी, दलित युवतींची छळवणूक होऊ नये म्हणून शासनाने तक्रार करण्यासाठी हेल्पलाईन सुरू करा आदी मागण्यांचे निवेदन यावेळी या युवतींनी दिले. यामध्ये नंदा वाघे, जया पारधी, सुमन हिलम, संगिता भोमटे, सविता पाटील, कमल गुलूम, हिराबाई खांजोडे, प्रमिला जाधव, गिता फसाले, संगिता वाघे, भिमा निरगुडा, अनिता वाघे, नैना म्हस्कर दिपाली भोईर, निकिता रायात वैशाली पाटील आदी युवतींनी या धडक मार्चात सहभाग घेऊन तीव्र निषेद नोंदवला, असे श्रमजीवीचे सरचिटणीस बाळाराम भोईर यांनी सांगितले.

 

 

 

 

टॅग्स :thaneठाणेcollectorजिल्हाधिकारी