शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

डॉ. विद्या शेट्टी यांची चौकशी, आरोग्य विभागामध्ये झाला आर्थिक गैरव्यवहार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2019 05:39 IST

भिवंडी पालिका : आरोग्य विभागामध्ये झाला आर्थिक गैरव्यवहार

भिवंडी : महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य व वैद्यकीय विभागातील प्रशासकीय अनियमितता व आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी नागरिकांच्या तक्रारीची दखल घेत महापौर जावेद दळवी यांनी सरकारकडे तक्रार करून फौजदारी कारवाईची मागणी केली होती. सरकारने दिलेल्या आदेशानुसार पालिका प्रशासनाने मुख्य लेखापरीक्षकांमार्फत प्रभारी वैद्यकीय अधिकारी डॉ. विद्या शेट्टी यांच्यासह फार्मासिस्ट, कार्यालयीन अधीक्षक, लिपिक व १५ आरोग्य केंद्रांचे डॉक्टर व कर्मचारी यांची चौकशी सुरू केली आहे.

शहरात १५ आरोग्य केंद्रे सुरू असून या केंद्रांत उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांसाठी सरकारने दरवर्षी औषधांचा पुरवठा केला आहे. त्यापैकी २०१५-१६ पासून २०१८-१९ पर्यंत या विभागातील प्रशासकीय अनियमितता, आर्थिक गैरव्यवहार तसेच सरकारकडून आलेल्या औषधांच्या नोंदीचे स्टॉक रजिस्टर, अनेक महत्त्वाचे दस्तऐवज गहाळ करून आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप दळवी यांनी करत तक्रार केली आहे. तसेच त्यांनी डॉ. शेट्टी यांच्यासह चार कर्मचारी तसेच १ ते १५ नागरी आरोग्य केंद्रे व वैद्यकीय आरोग्य विभाग यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे. याबाबत सरकारने अहवाल मागवला असून याची कार्यालयीन चौकशी करत आयुक्तांनी मुख्य लेखापरीक्षक कालिदास जाधव यांची नियुक्ती केली आहे. जाधव यांनी सुनावणी घेतली असता सरकारकडून आलेल्या औषधांच्या नोंदीचे स्टॉक रजिस्टर व अनेक महत्त्वाची कादगपत्रे डॉ. शेट्टी यांनी सादर केली नाही. काही औषधे व कागदपत्रे आगीमध्ये जळून खाक झाल्याचा बहाणा केला, अशी माहिती सूत्राने दिली. आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी डॉ. शेट्टी, फार्मासिस्ट आसीफ फारूख अन्सारी, कार्यालयीन अधीक्षक अशोक जाधव, लिपिक राजू घाडगे तसेच १५ आरोग्य केंद्रांतील डॉक्टर व कर्मचाºयांची सुनावणी होणार आहे. यामुळे खळबळ उडाली आहे.महापालिकेतील वैद्यकीय विभागातील अधिकारी व कर्मचाºयांची चौकशी करून अहवाल सादर करण्याची जबाबदारी माझ्याकडे सोपवली आहे. त्या अनुषंगाने याप्रकरणी चौकशी सुरू असून हा अहवाल आयुक्तांकडे सादर केला जाणार आहे.- कालिदास जाधव, मुख्य लेखापरीक्षकमहापालिकेच्या वैद्यकीय आरोग्य विभागातील गैरव्यवहाराबाबत विधानसभेत प्रश्न उपस्थित केला असून येत्या अधिवेशनात हा विषय चर्चेला घेण्यात येणार आहे.- महेश चौघुले, आमदार

टॅग्स :thaneठाणेThane Municipal Corporationठाणे महानगरपालिका