शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

डॉ. घाणेकर नाट्यगृहाच्या मिनी थिएटरच्या दुरुस्तीचे काम अर्ध्यावरच झाले बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2018 17:12 IST

डॉ. काशिनाथ घाणेकरच्या मिनी थिएटरचे काम सुरु होऊन आता ते अर्ध्यावरच बंद पडले आहे. काम का बंद झाले आहे, याचे उत्तर सध्या तरी पालिकेकडे नाही. किंवा ते केव्हा सुरु होणार याचीही काहीच थांगपत्ता प्रशासनाला नाही.

ठळक मुद्देसहा महिन्यापासून सुरु आहे केवळ दुरुस्तीविविध नाट्यस्पर्धांना बसला फटका

ठाणे - घोडबंदर भागातील डॉ. काशिनाथ घाणेकर मधील मीनी थिएटर १ आॅक्टोबर पासून दुरुस्तीसाठी बंद करण्यात आले होते. त्यानंतर आता वर्ष उलटूनही हे थिएटर अद्याप नाट्यप्रेमींसाठी खुले झालेले नाही. त्यामुळे या ठिकाणी छोटेखानी शो करण्याची किंवा इतर कार्यक्रम घेणाऱ्या आयोजकांची मात्र चांगलीच कुंचबना झाली आहे. मधल्या काळात थिएटरच्या दुरुस्तीचे काम सुरु करण्यात आले होते. परंतु ते अर्ध्यावरच बंद झाले आहे.

          मुख्य नाट्यगृहाचे मिनी थिएटर १ आॅक्टोबर पासून पुढील आदेश येई पर्यंत बंद ठेवण्यात आले होते. परंतु यामुळे या ठिकाणी होणाऱ्या अनेक कार्यक्रमांना याचा फटका बसला होता. विशेष म्हणजे मागील दिड वर्षे या नाट्यगृहाची डागडुजी सुरु असतांना पालिकेला या मिनी थिएटरची डागडुजी करता आली नाही का? असा सवाल आता उपस्थित झाला आहे. आता कुठे नाटयगृह सुरु झाले असतांना पुन्हा मिनी थिएटर बंद करण्यात येत असल्याने अनेक संस्थांचा हिरमोड झाला आहे. या संदर्भात पालिकेच्या संबधीत विभागाशी चर्चा केली असता, त्यांनी सांगितले की, मिनी थिएटरमध्ये गळती सुरु झाली आहे. ही गळती नेमकी कशामुळे होत आहे, याचे कारण अद्याप सापडू शकलेले नव्हते. त्यानंतर पाच महिन्यानंतर या थिएटरच्या कामाच्या दुरुस्तीचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता. यासाठी ८० लाखांची तरतूदही करण्यात आली होती. त्यानुसार मे अखेर हे थिएटर खुले होईल असा दावाही तत्कालीन अतिरिक्त आयुक्त सुनील चव्हाण यांनी केला होता.                   परंतु मिनी थिएटर बंद पडत असल्याने त्याचा फटका, अनेक छोटे मोठे आॅकेस्ट्रांचे कार्यक्रम, बालनाट्य महोत्सव, राज्य नाट्य स्पर्धा आदींसह दिवाळी पहाट, आदींसह इतर छोट्या मोठ्या कार्यक्रमांना बसला होता. त्यानंतर आतासुध्दा दिवाळीपूर्वी हे थिएटर सुरु होईल अशी शक्यता दिसत नाही. सध्या या थिएटरचे अर्धे काम झाले असून मागील महिनाभरापासून ते काम पुन्हा बंद झाले आहे. परंतु काम बंद का झाले, किंवा काम बंद आहे का? असा उलट सवाल पालिका प्रशासनानेच उपस्थित केला आहे. एकूणच पालिकेला याची कोणत्याही प्रकारची आस्था असल्याचे दिसत नाही. 

टॅग्स :thaneठाणेtmcठाणे महापालिकाcommissionerआयुक्त