शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहाच्या मिनी थिएटरच्या वाढीव खर्चाचा प्रस्ताव स्थायी समितीच्या पटलावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2018 16:11 IST

डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहातील मिनी थिएटरच्या वाढीव खर्चाचा प्रस्ताव अखेर स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरीसाठी पटलावर ठेवण्यात आला आहे. त्यानुसार मुळ खर्चात २७ लाख ३१ हजार ४८६ रुपयांची वाढ झाली आहे.

ठळक मुद्देनाट्यगृहाचा वाढला खर्चदिवाळीपूर्वी सुरु होणे कठीणच

ठाणे - घोडबंदर भागातील डॉ. काशिनाथ घाणेकर मधील मीनी थिएटर १ आॅक्टोबर पासून दुरुस्तीसाठी बंद करण्यात आले होते. त्यानंतर मधल्या काळात थिएटरच्या दुरुस्तीचे काम सुरु करण्यात आले होते. परंतु ते अर्ध्यावरच बंद झाले आहे. या संदर्भात महापौर मीनाक्षी शिंदे यांच्यासह ठाण्यातील कलावतांनी या नाट्यगृहाची पाहणीसुध्दा केली होती. परंतु या नाट्यगृहाच्या कामाचा खर्च वाढत असल्याचे कारण प्रशासनाने सांगितले होते. अखेर या वाढीव कामाच्या खर्चाचा प्रस्ताव ३० आॅक्टोबरच्या स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरीसाठी पटलावर ठेवण्यात आला आहे.

                  मुख्य नाट्यगृहाचे मिनी थिएटर १ आॅक्टोबर पासून पुढील आदेश येई पर्यंत बंद ठेवण्यात आले होते. परंतु यामुळे या ठिकाणी होणाऱ्या अनेक कार्यक्रमांना याचा फटका बसला होता. या संदर्भात पालिकेच्या संबधीत विभागाशी चर्चा केली असता, त्यांनी सांगितले की, मिनी थिएटरमध्ये गळती सुरु झाली आहे. ही गळती नेमकी कशामुळे होत आहे, याचे कारण अद्याप सापडू शकलेले नव्हते. त्यानंतर पाच महिन्यानंतर या थिएटरच्या कामाच्या दुरुस्तीचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता. यासाठी ८० लाखांची तरतूदही करण्यात आली होती. त्यानुसार मे अखेर हे थिएटर खुले होईल असा दावाही तत्कालीन अतिरिक्त आयुक्त सुनील चव्हाण यांनी केला होता. त्यानंतर आतासुध्दा दिवाळीपूर्वी हे थिएटर सुरु होईल अशी शक्यता दिसत नाही. सध्या या थिएटरचे अर्धे काम झाले असून मागील महिनाभरापासून ते काम पुन्हा बंद असल्याचे वृत्त लोकमतमध्ये प्रसिध्द झाले होते. त्यानंतर महापौर मीनाक्षी शिंदे आणि मराठी कलाकारांनी या नाट्यगृहाचा पाहणी दौरा केला होता. त्यानंतर दिवाळी पर्यंत हे नाट्यगृह सुरु न झाल्यास दिवाळी पहाटचा कार्यक्रम आम्ही करु असा इशाराही कलाकारांनी दिला होता.त्यानंतर आता दिवाळी अवघ्या आठ दिवसांवर आली असतांना वाढीव खर्चाचा प्रस्ताव स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरीसाठी पटलावर ठेवण्यात आला आहे. त्यानुसार वाढीव २७ लाख ३१ हजार ४८६ रुपयांचा खर्च आता केला जाणार आहे. परंतु तरीही हे नाट्यगृह दिवाळीपूर्वी खुले होईल असे वाटत नाही. 

टॅग्स :thaneठाणेtmcठाणे महापालिकाcommissionerआयुक्त