शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

डॉ. आंबेडकर हॉलमध्ये पीओपीचा भाग कोसळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2019 00:03 IST

कल्याण-डोंबिवली महापालिकेची बेफिकिरी; घटनेनंतरही झाला कार्यक्रम

डोंबिवली : पूर्वेतील केडीएमसीच्या डोंबिवली विभागीय कार्यालयातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहातील छताच्या पीओपीचा काही भाग कोसळल्याची घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली. दरम्यान, ही घटना घडल्यानंतरही या सभागृहात एक कार्यक्रम झाला. या प्रकारामुळे केडीएमसी प्रशासनाची बेफिकिरी उघडकीस आली आहे.डोंबिवली विभागीय कार्यालयाची वास्तू ४० वर्षे जुनी आहे. त्यामुळे याठिकाणची कार्यालये अन्यत्र स्थलांतरित करण्याचा निर्णय आयुक्त गोविंद बोडके यांनी घेतला आहे. त्याप्रमाणे लवकरात लवकर त्यासंदर्भात कार्यवाही करण्याचे आदेशही त्यांनी दिले आहेत. ‘फ’ प्रभागाचे कार्यालय पी.पी. चेंबर तर ‘ग’ प्रभागाचे कार्यालय सुनीलनगर येथे हलवण्यात येणार आहे. मात्र, या हालचालींना अद्याप मुहूर्त मिळालेला नाही. त्यातच या इमारतीमधील पहिल्या मजल्यावर असलेल्या डॉ. आंबेडकर सभागृहातील पीओपीचा भाग कोसळल्याची घटना घडली आहे. रविवारी सायंकाळी या सभागृहात एक कार्यक्रम होता, तोपर्यंत काहीही घडले नव्हते. परंतु, सोमवारी सकाळी जेव्हा सभागृह उघडण्यात आले, तेव्हा मात्र पीओपीचा काही भाग कोसळल्याचे कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आले. रात्री अथवा मध्यरात्री ही घटना घडली असावी, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. महापालिकेच्या या वास्तूमध्ये अनेक ठिकाणी भिंतींना भेगा पडल्या असून छताला असलेले प्लास्टरही पडल्याच्या घटना काही ठिकाणी यापूर्वी घडल्या आहेत. येथील पुरुष-स्त्री प्रसाधनगृह अत्यंत दयनीय अवस्थेत असून येथील गळके छत कोसळून अपघात होण्याचीही शक्यता नाकारता येत नाही. दरम्यान, पीओपी कोसळल्याच्या घटनेनंतर तरी कार्यालय स्थलांतर करण्याच्या प्रक्रियेला वेग येणार का, असा सवाल कर्मचाऱ्यांकडून केला जात आहे.अगोदरच बुकिंगडॉ. आंबेडकर सभागृहात पीओपी कोसळल्याची घटना सकाळी उघडकीस आल्यानंतरही याठिकाणी कार्यक्रम पार पडला. सुरक्षारक्षकांनी घडलेल्या घटनेची माहिती दिल्यानंतरही आयोजकांनी तेथे कार्यक्रम घेतला. यासंदर्भात सभागृहाचे व्यवस्थापन सांभाळणारे सुधाकर पाटील यांच्याशी संपर्क साधला असता कार्यक्रमाचे बुकिंग आधीच झाल्याने कार्यक्रम करायला दिल्याचे त्यांनी सांगितले.