शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे जिल्ह्यातील ग्राहकांच्या ज्ञानोंद्रीया... विषयावर डॉ. प्रभुदेसाईना ‘पीएचडी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2019 17:13 IST

‘ठाण्यातील विद्या प्रसारक मंडळाच्या के. ग. जोशी कला आणि ना.गो . बेडेकर वाणिज्य’ या वरिष्ठ महाविद्यालयात डॉ. प्रभुदेसाई कॉमर्स शाखेच्या विद्यार्थ्यांना विद्यादान करीत आहेत. त्यांनी आतापर्यंत एम .कॉम , एम . फिल ., एम .बी. ए. ( मार्केटिंग), सेट , बी.एड इत्यादी पदव्या अत्यंत कष्टपूर्वक मिळविल्या आहेत.

ठळक मुद्देडॉक्टरेट पदवी संपादन पाच वर्षे अत्यंत मेहनतपूर्वकअभ्यासपूर्ण विषयावर मुंबई विद्यापीठाची पीएचडी

ठाणे : ठाणे जिल्ह्यातील ग्राहकाच्या खेरीदी विषयी ठाणे येथील प्राध्यापिका डॉ. अर्चना प्रभुदेसाई यांना ‘ग्राहकांच्या ज्ञानोंद्रीयांचा त्यांच्या अल्पायुषी (नॉन ज्युरेबल) वस्तुंच्या खरेदी निर्णयावर होणाऱ्या प्रभावाचा अभ्यास - ठाणे जिल्हा अर्तगत’ या अभ्यासपूर्ण विषयावर मुंबई विद्यापीठाने पीएचडी म्हणजे डॉक्टरेट (विद्यावाचस्पती) आज प्रदान केली आहे. या मुळे त्यांचे सर्वत्र कौतूक होत आहे         ‘ठाण्यातील विद्या प्रसारक मंडळाच्या के. ग. जोशी कला आणि ना.गो . बेडेकर वाणिज्य’ या वरिष्ठ महाविद्यालयात डॉ. प्रभुदेसाई कॉमर्स शाखेच्या विद्यार्थ्यांना विद्यादान करीत आहेत. त्यांनी आतापर्यंत एम .कॉम , एम . फिल ., एम .बी. ए. ( मार्केटिंग), सेट , बी.एड इत्यादी पदव्या अत्यंत कष्टपूर्वक मिळविल्या आहेत. या यशस्वी वाटचालीनंतर त्यांनी ठाणे जिल्ह्यातील ग्राहकांच्या खरेदीतील ज्ञाना विषयी डॉ. प्रा. किशोरी भगत यांच्या मार्गदर्शनाखाली ही डॉक्टरेट पदवी संपादन केली आहे. गेली पाच वर्षे अत्यंत मेहनतपूर्वक, चिकाटीने, संशोधकवृत्तीने डॉ. प्रभुदेसाई यांनी ग्राहकांच्या विषयावर संशोधन केले.            ठाणे जिल्ह्यातील ग्राहकांच्या खरेदीच्या ज्ञानावरील नाविण्यपूर्ण संशोधनासाठी डॉक्टरेट पदवी मुंबई विद्यापिठाने सन्मानपूर्वक डॉ. प्रभुदेसाई यांना प्रदान केली आहे. या विषयी त्या म्हणाल्या की ‘आजचा दिवस माझ्या दृष्टिने अत्यंत महत्वाचा असून माझ्या यशाचे श्रेय माझ्या कुटुंबियाना , माझ्या महाविद्यालयाला तसेच संशोधनासाठी सतत प्रोत्साहन देणारे डॉ. विजय बेडेकर आणि होकारात्मक दिशेने मार्गदर्शन करणा-या प्राचार्या डॉ. सुचित्रा नाईक यांना आहे’ असे त्यांनी लोकमतला सांगितले.............फोटो - ०२ठाणे डॉ. प्रभुदेसाई