शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहाच्या दुरुस्तीचा खर्च अडीच कोटीने वाढला

By admin | Updated: April 25, 2017 00:10 IST

घोडबंदर भागातील डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहाच्या वर्षभरापूर्वी कोसळलेल्या पीओपीच्या छताच्या दुरुस्तीचे काम कासवगतीने सुरू असून

ठाणे : घोडबंदर भागातील डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहाच्या वर्षभरापूर्वी कोसळलेल्या पीओपीच्या छताच्या दुरुस्तीचे काम कासवगतीने सुरू असून पालिकेने सुरुवातीला या कामासाठी २३ लाखांचा खर्च होईल, असे सांगितले होते. परंतु, प्रत्यक्षात तो दोन कोटी ८५ लाखांवर गेला आहे. विशेष म्हणजे पालिका हा खर्च करणार नसून तो हिरानंदानी बिल्डर्स करणार आहे. यामध्ये आता वायरिंग, अग्निशमन प्रतिबंधात्मक योजना आणि वॉटर प्रूफिंगचाही समावेश आहे. विशेष म्हणजे पालिकेच्या अभियांत्रिकी विभागाने यापूर्वी केलेल्या खर्चाच्या अंदाजपत्रकात तब्बल अडीच कोटीहून अधिक रकमेची वाढ झाल्याने साऱ्यांच्या भुवया उंचावल्या असून या विभागाच्या तांत्रिक कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.मागील वर्षी २४ एप्रिलला रात्री १२ च्या सुमारास पीओपीचा स्लॅब १८० खुर्च्यांवर पडला होता. सुदैवाने प्रेक्षक बाहेर पडल्यानंतर ही दुर्घटना घडल्याने अनर्थ टळला होता. या घटनेमुळे पालिकेच्या कारभारावर टीकेची झोड उठली होती. १५ ते २० दिवसांत दुरु स्ती काम पूर्ण करून नाट्यगृहाचा पडदा पुन्हा उघडेल, असे आश्वासन त्या वेळी देण्यात आले होते. मात्र, प्रत्यक्षात वर्ष लोटले तरी अद्यापही तो काही उघडला गेला नाही. पालिकेने या कामासाठी २३ लाख रु पये खर्चाचे अंदाजपत्रक तयार करून तशी निविदा काढली होती. मात्र, ती प्रक्रि या अर्धवट ठेवून हिरानंदानी बिल्डर्सकडे हे दुरुस्तीचे काम सोपवण्याचा निर्णय घेतला. या निर्णयालाही जवळपास ६ महिने लोटले असून आता कुठे कासवगतीने ते सुरू झाले आहे. याबाबत पालिकेच्या संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता इलेक्ट्रिकल आणि फायर सेफ्टीच्या दृष्टीने आवश्यक असलेल्या बाबींची तपासणी करून त्याबाबतचा अहवाल तयार झाला आहे. येत्या दोन दिवसांत पीओपीसह वायरिंग आणि छताच्या वॉटर प्रूफिंगचे काम सुरू केले जाईल, असेही त्यांनी सांगितले. या कामासाठी जवळपास २ कोटी ८५ लाखांचा खर्च अपेक्षित आहे. (प्रतिनिधी)