कल्याण : सशस्त्र सहा जणांच्या टोळक्याने केलेल्या हल्ल्यात दाम्पत्य जखमी झाल्याची घटना कल्याण पूर्वेत मंगळवारी घडली. याप्र्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली आहे.नारायण दत्ता (४५) आणि नंदा (४०, रा. शिव सह्याद्री सोसायटी, काटेमानिवली) अशी जखमी दाम्पत्याची नावे आहे. दत्ता दाम्पत्य मंगळवारी दुपारी स्कूटरवरून जात होते. इतक्यात चॉपर, लोखंडी पाइप आणि फावड्याचे दांडे घेऊन आलेल्या टोळक्याने त्यांच्यावर हल्ला केला. त्यात नारायण यांच्या डाव्या हाताचे बोट व उजव्या हातास दुखापत झाली. डावा पाय फ्रॅक्चर झाला. नारायण यांच्यावर उपचार सुरू आहेत. हल्लेखोरांनी नंदा यांनाही झोडपून त्यांच्या गळ्यातील १२ ग्रॅमची चेन लांबवली. हा सर्व प्रकार परिसरातील सर्वांदेखत सुरू होता. मात्र, सशस्त्र हल्लेखोरांना प्रतिबंध करण्याचे धाडस कुणालाही करता आले नाही. कोळसेवाडी पोलिसांनी नारायण दत्ता यांच्या जबानीवरून सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करून एकाला अटक केली. (प्रतिनिधी)
कल्याणमध्ये दाम्पत्यावर हल्ला
By admin | Updated: March 30, 2017 06:38 IST