शहरं
Join us  
Trending Stories
1
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
2
पिंपरी-चिंचवडमध्ये ठाकरेंची 'मशाल' विझली; शहराध्यक्ष संजोग वाघेरेंचा राजीनामा; भाजपमध्ये प्रवेश निश्चित
3
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
4
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
5
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
6
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
7
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
8
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
9
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
10
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
11
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
12
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
13
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
14
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
15
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
16
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
17
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
18
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
19
बुरखा न घातल्याने पत्नीसह २ लेकींची हत्या; चेहरा दिसू नये म्हणून १८ वर्षे काढलं नाही आधार कार्ड
20
मोठी बातमी! भारत-ओमानमध्ये मुक्त व्यापार करार; देशातील 'या' उद्योगांना थेट फायदा
Daily Top 2Weekly Top 5

लढा कोरोनाशी : डबलिंग रेट गेला ४७ दिवसांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2020 03:07 IST

लढा कोरोनाशी : कल्याण-डोंबिवली महापालिका आयुक्त विजय सूर्यवंशी यांची माहिती

कल्याण : केडीएमसी हद्दीतील कोरोना रुग्णवाढीचा दर आता नऊ दिवसांवरून ४७ दिवसांवर गेला आहे. आॅगस्टच्या अखेरीस हा डबलिंग रेट ६० दिवसांवर जाऊ शकतो. त्यानंतर कोरोना रुग्ण सापडण्याचे प्रमाण महापालिका हद्दीत आणखी कमी झाल्याचे दिसून येईल, असा दावा महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी केला आहे.

जूनच्या मध्यंतरीस व जुलैच्या सुरुवातीस कोरोना रुग्ण आढळण्याचे प्रमाण वाढले होते. कोरोना रुग्णांची वाढती संख्या कमी करण्यासाठी मनपाने काही हॉटस्पॉट जाहीर केले होते. तेथे नागरिकांना फिरण्यास बंदी घालण्यात आली होती. जुलैमध्ये घेतलेल्या १७ दिवसांच्या लॉकडाऊनचे चांगले परिणाम दिसून येत आहेत. ३० जूनला डबलिंग रेट हा नऊ दिवस होता. आता तो ४७ दिवसांवर पोहोचला आहे. त्याचबरोबर रुग्णांची संख्याही स्थिरावली आहे. रुग्णसंख्या कमी होण्याची शक्यता आहे. डबलिंग रेट ६० दिवस झाल्यावरच रुग्णसंख्या आणखी नियंत्रणात येऊ शकते. डबलिंग रेटचा कालावधी वाढविणे हे तसे आव्हानात्मक काम आहे, असे सूर्यवंशी यांनी सांगितले. १५ जुलैपर्यंत २० हजार रुग्णसंख्या होईल, असा अंदाज बांधला होता. मात्र, उपाययोजना केल्याने २० हजार रुग्णसंख्या ही आॅगस्टमध्ये झाल्याचे ते म्हणाले. त्याचबरोबर सगळ्यात सुखद बाब म्हणजे मनपा हद्दीत कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७५ टक्के आहे. एकूण रुग्णसंख्येपैकी १५ हजार १०५ रुग्ण बरे झालेले आहेत. टाटा आमंत्रा हे महापालिकेचे सगळ्यात मोठे कोविड केअर सेंटर असून, तेथून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण जास्त आहे. एकूण रुग्णसंख्या ही २० हजारांवर पोहोचली आहे. मात्र, सध्या प्रत्यक्षात साडेपाच हजार रुग्णांवर उपचार सुरू आहेत. १५ हजारपेक्षा जास्त रुग्ण हे बरे होऊन घरी गेले आहेत. त्याचे श्रेय आरोग्य विभागाचे आहे, असे आयुक्त म्हणाले.६०० बेडची व्यवस्थाच्शास्त्रीनगर रुग्णालयात सुरुवातीला कोविड रुग्णालय सुरू केले होते. तेथे केवळ ५२ बेडची सुविधा होती. त्यामुळे मनपाने होलीक्रॉस, आर. आर. रुग्णालय आणि नियॉन रुग्णालय अधिग्रहित केले. त्यानंतर जंबो सेटअपद्वारे डोंबिवली क्रीडा संकुलात आणि पाटीदार हॉलमध्ये कोविड रुग्णालय सुरू केल्याने बेडची संख्या वाढली.च्सध्या मनपाकडे ५५० आॅक्सिजन व ५० आयसीयू बेड आहेत. त्यात १० आॅगस्टपर्यंत कल्याणमधील काळसेकर शाळेत, फडके मैदान येथील आर्ट गॅलरीत आणि डोंबिवली जिमखाना येथे कोविड रुग्णालय सुरू होईल. तेथे एकूण २०० आयसीयू व ४०० आॅक्सिजन बेड वाढणार आहेत. या सुविधा रुग्णांना उपलब्ध होताच १० आॅगस्टनंतर रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आणखी वाढेल, असा दावा आयुक्तांनी केला आहे.

टॅग्स :thaneठाणेauto rickshawऑटो रिक्षा