शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

स्वाईन फ्लूच्या रुग्णांमध्ये दुप्पट वाढ, रुग्णसंख्या ६६ च्या घरात

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2022 18:52 IST

Swine Flu : बुधवारी  स्वाईन फ्लूच्या रुग्णांची संख्या ३४ एवढी होती. मात्र गुरुवारी ही संख्या थेट ६६ वर पोहचली आहे. त्यामुळे आता आरोग्य प्रशासनाची चिंता वाढली आहे. 

ठाणे : कोरोना पाठोपाठ आता स्वाईन फ्लूच्या रुग्णातही मोठी वाढ झाल्याचे दिसून आले. अवघ्या दोन दिवसात स्वाईनच्या रुग्णसंख्येत दुप्पट वाढ झाल्याचे दिसत आहे. त्यातही जिल्ह्यात रुग्ण वाढ होत असतांना ठाणे शहरात या आजाराच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागल्याचे दिसत आहे. परंतु या रुग्णांवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु असल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. बुधवारी  स्वाईन फ्लूच्या रुग्णांची संख्या ३४ एवढी होती. मात्र गुरुवारी ही संख्या थेट ६६ वर पोहचली आहे. त्यामुळे आता आरोग्य प्रशासनाची चिंता वाढली आहे. 

ठाणे जिल्ह्यातील शहरी भागासह ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आला आहे. असे असताना, दुसरीकडे स्वाईन फ्लू या आजाराने थैमान घालण्यास सुरुवात केली आहे. बुधवारी ठाणे जिल्ह्यात स्वाईन फ्लूच्या बाधित रुग्णांची संख्या ३४ इतकी होती. तर, ३ जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली होती. मात्र, गुरुवारी दुसऱ्या दिवशी स्वाईन फ्लू रुग्णांच्या संख्येत दुपट्टीने वाढ झाल्याचे दिसून आले. गुरुवारी जिल्ह्यात स्वाईन फ्लूच्या रुग्णांची संख्या थेट ६६ वर गेली आहे. असे असले तरी या आजाराने मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या मात्र, जैसे थे असल्याचे दिसून येत आहे. 

यामध्ये ठाणे महापलिका हद्दीत सर्वाधिक ४० रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापाठोपाठ कल्याण डोंबिवली पालिकेत रुग्णांची संख्या ९ वरून १८ इतकी झाली आहे. नवी मुंबईत दोन रुग्णांची वाढ झाल्याने तेथील रुग्णांचा आकडा ५ वर गेला आहे. तसेच बुधवार पर्यंत एकही रुग्णांची नोंद नसलेल्या मिरा भाईंदरमध्ये एका रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, एकीकडे स्वाईन फ्लू  या आजाराच्या रुग्णांच्या संख्येत दुपट्टीने वाढ होत आहे. या आजाराने मृत्यू होणाऱ्या रुग्णांची संख्या मात्र, जैसे थे आहे. त्यामुळे काहीसा दिलासा मिळत आहे. तर, स्वाईन फ्लू या आजाराने मात्र, आरोग्य यंत्रणांची झोप उडाली असून यंत्रणा सतर्क झाल्या आहेत.

टॅग्स :Swine Flueस्वाईन फ्लूthaneठाणे