शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

"वंचित बहुजन आघाडीची समविचारी पक्षांसाठी चर्चेची दारे खुली"

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2020 00:18 IST

पालिका निवडणुकीसाठी घेतली बैठक

अंबरनाथ : अंबरनाथ नगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पक्षाची भूमिका स्पष्ट करण्यात आली आहे. वंचित बहुजन आघाडीमुळे मतांचे विभाजन होत असल्याच्या आरोपावर उत्तर देताना निरीक्षक जानू मानकर यांनी स्पष्ट केले की, आगामी पालिका निवडणुकीत समविचारी पक्षांसोबत वंचित आघाडी करेल. त्यामुळे चर्चेची दारे ही उघडी असल्याचे त्यांनी नमूद केले.नगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने वंचित बहुजन आघाडीने अंबरनाथसाठी मानकर यांची निरीक्षक पदावर नियुक्ती केली आहे. त्यांची नियुक्ती झाल्यावर पहिली बैठक अंबरनाथमध्ये झाली. कार्यकर्त्यांसह झालेल्या बैठकीनंतर पत्रकार परिषदेत त्यांनी पक्षाची भूमिका मांडली. पालिका निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी ही स्वबळावर सर्व जागा लढविणार आहे. इच्छुक उमेदवारही मोठ्या संख्येने संपर्कात आहेत. असे असले तरी समविचारी पक्षांसोबत चर्चा करण्यासाठी आम्ही तयार आहोत. वंचितांना सोबत जो घेऊन जाईल अशा समविचारी पक्षांसाठी चर्चेची दारे उघडी असतील. तसेच निवडणूकपूर्व किंवा निवडणुकीनंतर सत्ता स्थापन करताना कुणासोबत जाणे योग्य राहील याची चर्चा पक्षश्रेष्ठींकडे केली जाईल. त्यानंतरच हा निर्णय घेतला जाईल.  निवडणुकीला सामोरे जाताना स्थानिक कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनाही विश्वासात घेतले जाईल, असे ते म्हणाले. विधानसभेत मिळालेल्या मतांमध्ये वाढ करण्याच्या अनुषंगाने पालिकेची निवडणूक महत्त्वाची असेल असे ते म्हणाले.शिवसेनेने काँग्रेसचे विचार स्वीकारलेराज्यात सत्ता स्थापन करताना काँग्रेस किंवा राष्ट्रवादीने शिवसेनेचे विचार स्वीकारलेले नाहीत. मात्र राज्यात सत्ता स्थापन करताना स्थिरतेसाठी शिवसेनेने काँग्रेसचे विचार स्वीकारण्याची तयारी ठेवली. 

टॅग्स :Vanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडी