शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

थांबू नका... यश नक्की मिळेल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2019 01:13 IST

प्रणय सांगतो की, मुंबईमध्ये संगीताचे शास्त्रोक्त शिक्षण घेत असताना सहकारी मित्रमंडळी कार्यक्रम करत होते.

ठाण्यात राहणारा प्रणय गोमाशे हा एक उत्तम गायक असून त्याचा स्वत:चा म्युझिक बॅण्ड आहे. त्याने चंद्रपूर येथील सरदार पटेल महाविद्यालयातून एम. कॉम, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, नागपूर विद्यापीठातून बीए म्युझिक आणि छत्रपती शाहूजी महाराज कानपूर मुक्त विद्यापीठातून संगीत विभागातून एम. ए. म्युझिकचे शिक्षण घेतले आहे. प्रणयचे आजोबा काकड आरतीला जायचे. तसेच वडिलांना भजनाची आवड असल्यामुळे तो वारसा त्याला लाभला. पुढे करिअर करण्यासाठी प्रणयने मुंबई गाठली.

प्रणय सांगतो की, मुंबईमध्ये संगीताचे शास्त्रोक्त शिक्षण घेत असताना सहकारी मित्रमंडळी कार्यक्रम करत होते. प्रणय जी म्युझिशियन अ‍ॅण्ड बॅण्डच्या माध्यमातून मराठी, हिंदी, वेस्टर्न, अभंग, भक्तिगीते इत्यादी संगीताच्या वेगवेगळ्या तºहा लोकांसमोर नव्याने सादर करण्याचा एक प्रयत्न सुरू आहे. जुन्या गाण्यांच्या संयोजनाला धक्का न लावता आधुनिक वाद्यांचा वापर करून आमच्या बॅण्डला युनिक बनवते. गायनाव्यतिरिक्त मला नवनव्या ठिकाणी फिरायला आवडते. खासकरून निसर्गाच्या सान्निध्यात मुक्त विहार करायला आवडतो, नवीन लोकांना भेटणे, ट्रेकिंग, वाचन, इत्यादी आवडीनिवडी आहेत. विविध राज्यस्तरीय गायन स्पर्धा, आंतरविद्यापीठ गायन स्पर्धा, जागतिक सांस्कृतिक महोत्सव इत्यादी स्पर्धेत सहभाग घेतला असून विविध सामाजिक संघटनांमार्फत देण्यात येणाऱ्या ‘युवा पुरस्कारा’ने गौरविण्यात आले आहे. सुप्रसिद्ध गायक सुरेश वाडकर गुरुजींशी झालेली पहिली भेट आणि गाणं ऐकल्यावर त्यांनी दिलेले कौतुकाची थाप मी आयुष्यात कधीही विसरू शकणार नाही. आयुष्यात मोठे ध्येय ठेवा, मिळालेल्या कामाबद्दल प्रामाणिक राहा, थांबू नका शेवटी यश मिळेल, असा संदेश प्रणयने तरुण पिढीला दिला आहे.- प्रणय गोमाशे, गायक

टॅग्स :thaneठाणे