शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

१० मिनिटांत शरद पवार कसे मांडायचे हे कळत नाही; 'असे' ते एकमेव नेते - जितेंद्र आव्हाड

By अजित मांडके | Updated: December 12, 2022 13:14 IST

आपल्या देशाला वाचवायचा असेल तर हा शिवबाचा महाराष्ट्र शाहू फुले यांचे विचार मांडायला पाहिजे असं आव्हाड म्हणाले.

ठाणे - अवघ्या १० मिनिटांत शरद पवार कसे मांडायचे हे कळत नाही. महाराष्ट्राची तळ हातावर माहिती असणारा हा एकमेव नेता आहे. चंद्रपूरचे रस्ते तोंड पाठ होते. भंडारा जिल्ह्यातील अधिकारी यांच्या सोबत बैठक झाली पाण्याची त्याची देखील माहिती पवारांना असते. राजकारणात मैत्री राजकारणांपलीकडे असली पाहिजे. कुणीही किती टीका करा त्यावर ते कधीही रिएक्शन देत नाहीत अशा शब्दात राष्ट्रवादी नेते जितेंद्र आव्हाड यांनी पवारांचे कौतुक केले आहे. 

शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. जितेंद्र आव्हाड म्हणाले की, सुरक्षा दलात पहिल्यांदा महिलांना स्थान मिळाले. महिलांना आरक्षण देणारा कायदा शरद पवारांनी आणला. आंदोलन हा राजकीय जीवनातला भाग आहे. मीदेखील आंदोलन केले नसते तर आज इथं नसतो. पवारांची उघड बाजू घेणारा म्हणून माझ्यावर गुन्हा दाखल झाला. आपल्या देशाला वाचवायचा असेल तर हा शिवबाचा महाराष्ट्र शाहू फुले यांचे विचार मांडायला पाहिजे. मग ते सीमा प्रश्न असो ताकतीने पुढे उभे राहिले पाहिजे असं आव्हाड म्हणाले. 

पत्रकारावर गुन्हा दाखल होणं चुकीचंचंद्रकांत पाटील यांच्यावर पुण्यात शाईफेक करण्यात आली या प्रकरणी पोलिसांनी शाई फेक करणाऱ्या आंदोलकांवर गुन्हे दाखल करत एका पत्रकाराला देखील ताब्यात घेतले. मात्र पत्रकारावर गुन्हा दाखल करणं हे अत्यंत चुकीचं आहे. पत्रकार हा पत्रकारच काम करत असतो. कोणीही जाणूनबुजून करत नाही आणि सरकारने इतक्या छोट्या मनाच असू नये. सरकार मोठ्या मनाचं असलं पाहिजे. कारण तुम्ही सत्ताधारी आहात. तुमच्या विरोधात आंदोलन होणार, विरोधात निवेदन येणार आपल्या विरोधात बोललं जाणार. परंतु सरकारने यावर पाणी सोडून थंड केलं पाहिजे आणि आपण कसे पुढे जायचं हे बघायचं असतं असंही जितेद्र आव्हाडांनी सांगितले. जीवावर उधार होऊनच आंदोलन होतातपत्रकार कुठल्याही गटात नसतात ते आपल काम करत असतात. माझ्या सोबत देखील असेच घडलं ना. जर एका पत्रकाराने महिलेला बाजूला करतानाचा माझा व्हिडिओ काढला नसता तर या विरोधकांनी मला अजून फसवलं असतं आणि ते त्यांचे काम आहे. पोलिसांना टार्गेट करण्याचं काय कारण पोलीस काय करणार त्यामध्ये निष्कारण गरीब पोलिसांना आपण अडचणीत आणून कारवाई करतो. माणुसकीतून विचार केला तर आंदोलन करण्याची पद्धत हीच आहे. आंदोलन हे जीवावर उधार होऊनच केलं जातं. मी स्वतः एका डॉक्टरच्या अंगावर शाई फेकली होती. एका मुख्याध्यापकावर शाई फेकली होती आणि त्यासाठी आपण शरद पवार यांच्या शिव्या देखील खाल्या असल्याचं आव्हाड यांनी सांगितले.

टॅग्स :Jitendra Awhadजितेंद्र आव्हाडSharad Pawarशरद पवार