शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

डोंबिवलीत रविावरी सहा गुणीजनांचा अभिवादन सोहळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2018 12:24 IST

डोंबिवलीत निवडक नामवंत नागरिकांचा गावकीतर्फे सन्मान करण्याची प्रथा विविध क्षेत्रात काम करणा-या ४१ संस्थांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या ‘नागरी सत्कार समिती’ने २०१४ साली सुरु केलेल्या सहा गुणीजनांचा सत्कार यंदाही रविावरी करण्यात येणार आहे.

ठळक मुद्दे टिळकनगर विद्या मंदिराच्या पटांगणात कार्यक्रम नागरि सत्कार समितीच्या उपक्रमाचे ५ वे वर्ष

डोंबिवली: निवडक नामवंत नागरिकांचा गावकीतर्फे सन्मान करण्याची प्रथा विविध क्षेत्रात काम करणा-या ४१ संस्थांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या ‘नागरी सत्कार समिती’ने २०१४ साली सुरु केलेल्या सहा गुणीजनांचा सत्कार यंदाही करण्यात येणार आहे. यावेळी अंधत्व निवारण कार्यकर्त्या- सरोज नेरुरकर, आर्थिक गुंतवणूक क्षेत्रात योगदान देणा-या हेमा धारगळकर, कामगार क्षेत्र- श्रीनिवास जोशी, ज्येष्ठ नागरिक संघटन-क्षेत्र रमेश पारखे, शिक्षण आणि राष्ट्रीय सामाजिक सेवा - डॉ. कृष्णन नम्बुद्री तसेच रोटरी, वैद्यकीय मदत - एन. आर. हेगडे यांचा सन्मान समिती करणार आहे.हा सोहळा टिळकनगर विद्या मंदिराच्या पटांगणावर रविवार, ११ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५.३० वाजता जेष्ठ संपादक विजय कुवळेकर यांच्या प्रमुख उपस्थितित आणि जेष्ठ पत्रकार सुधीर जोगळेकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे .गुणीजनांच्या कार्याचा आदर्श पुढल्या पिढ्यांपुढेही रहावा, आणि त्यातून स्फूर्ती घेत सामाजिक बांधिलकी मानणारी, गावकीचे भान राखणारी तरुण कार्यकर्त्यांची नवी पिढी उभी रहावी या उद्देशाने नागरी सत्कार समिती पाच वर्षांपासून सहा डोम्बिवलीकर स्त्री-पुरुषांचा सन्मान करते. शहराच्या सव्वाशे वर्षांच्या वाटचालीतल्या मोठ्या टप्प्याची साक्षीदार असलेली आणि आपल्या अंगभूत गुणांच्या आधारे शहराच्या सर्वांगीण विकासास हातभार लावलेली अशी मोजकीच मंडळी आता वयोमान उलटूनही सार्वजनिक क्षेत्रात सक्रीय आहेत. त्यातली काही त्यांच्या त्यांच्या कार्यक्षेत्रामुळे प्रसिद्धीच्या झोतात राहिली आहेत, तर काहींनी प्रसिद्धीची अपेक्षाही न ठेवता शहरासाठी आपलं अनमोल योगदान दिलं आहे. ज्यांनी प्रसिद्धीच्या झोतात राहणं पसंत केलं नाही, अशांचा सत्कार करण्याचा समिती प्रयत्न करत असल्याचे सांगण्यात आले. 

टॅग्स :dombivaliडोंबिवलीVinod Tawdeविनोद तावडेcultureसांस्कृतिक