शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

डोंबिवलीत न्यायालयाचा अवमान? ‘नो हॉकर्स’मध्ये पुन्हा अतिक्रमण : फेरीवालाविरोधी कारवाई थंडावल्याचे चित्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2017 01:48 IST

सर्वाेच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार अधिकारी आणि कर्मचारी प्रभावीपणे फेरीवाल्यांविरोधात कारवाई करत असल्याचा दावा करत केडीएमसीचे आयुक्त पी. वेलरासू यांनी त्यांचे कौतुक केले.

डोंबिवली : सर्वाेच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार अधिकारी आणि कर्मचारी प्रभावीपणे फेरीवाल्यांविरोधात कारवाई करत असल्याचा दावा करत केडीएमसीचे आयुक्त पी. वेलरासू यांनी त्यांचे कौतुक केले. प्रत्यक्षात मात्र प्रशासनाची कारवाई थंडावली आहे. रेल्वे स्थानकापासून १५० मीटर परिसरता व्यवसाय करण्यास मनाई असतानाही अतिक्रमण करत फेरीवाल्यांनी न्यायालयाचाही अवमान केल्याचे चित्र डोंबिवलीत सध्या दिसत आहे. रेल्वेच्या पादचारी पुलाला लागून असलेल्या स्कायवॉकवर रात्री सर्रासपणे फेरीवाले ठाण मांडतात. त्यामुळे एकंदरीतच दिखावा ठरत असलेली कारवाई पाहता ‘नव्याचे नऊ दिवस’ याची प्रचिती आल्यावाचून राहत नाही.एल्फिन्स्टनच्या दुर्घटनेनंतर मनसेने घेतलेल्या आक्रमक पवित्र्यामुळे सर्वत्र फेरीवाल्यांविरोधात जोमाने कारवाई सुरू झाली. केडीएमसीनेही रेल्वेस्थानक परिसर फेरीवालामुक्त करण्यासाठी अधिकारी व कर्मचाºयांची विशेष पथके नेमून दिवस-रात्र कारवाईला प्रारंभ केला. प्रारंभी ही कारवाई प्रभावीपणे दिसली, मात्र आता कुठेतरी ही कारवाई थंडावत असल्याचे दिसत आहे. कारवाईसाठी जाणारे पथक हे एकाच जागी ताटकळत उभे राहत असल्याने डोंबिवली रेल्वेस्थानकानजीकच्या काही छोट्या गल्ल्यांमध्ये फेरीवाल्यांचे व्यवसाय बिनदिककतपणे सुरू झाले आहेत. पथके कारवाईसाठी येताच फेरीवाले मात्र सामान लपवून त्याच जागी उभे राहत असल्याचे चित्रही पहावयास मिळत आहे. प्रारंभी कारवाई सुरू झाली तेव्हा नुसती कारवाई करू नका, पुनवर्सनाचेही बघा, अशी मागणी फेरीवाला संघटनांनी केडीएमसीकडे केली होती. तसेच १५० मीटरच्या बाहेरही कारवाई करून केडीएमसी न्यायालयाचा अवमान करत असल्याचा आरोपही संघटनांच्या नेत्यांनी केला होता. आयुक्त पी. वेलरासू यांच्याबरोबर झालेल्या बैठकीत फेरीवाल्यांविरोधातील १५० मीटर परिसरातील कारवाई सुरूच राहील, असे वेलरासू यांनी स्पष्ट केले होते. परंतु, पथकातील अधिकारी आणि कर्मचाºयांच्या कृपाशीर्वादाने पुन्हा फेरीवाल्यांनी तेथे ठाण मांडून एकप्रकारे न्यायालयाचाही अवमान केला आहे.उर्सेकरवाडीतील मधुबन सिनेमासमोरचा भाग काहीप्रमाणात सकाळी मोकळा दिसत असलातरी तेथे फेरीवालाविरोधी पथकाचे वाहन आणि दुचाकींचे पार्किंग होत आहे. परंतु, आजुबाजुच्या गल्ल्यांमध्ये मात्र फेरीवाल्यांचे ठेले पुन्हा सुरू झाले आहेत. स्थानकाबाहेरील राथ रोड, नेहरू रोडलगतच्या बाजारपेठेत सकाळी फेरीवाले बसले होते.कल्याणमध्येही्नेरस्ते बळकावले-फेरीवाल्यांवर कारवाईसाठी सकाळी ६ ते दुपारी ३ आणि दुपारी ३ रात्री मध्यरात्री १२ पर्यंत या दोन सत्रांत केडीएमसीने अधिकारी आणि कर्मचाºयांची पथके तैनात होती. परंतु, सकाळी आणि सायंकाळचा काही कालावधी पुरतीच ही कारवाई मर्यादित असल्याचे दिसत आहे.स्कायवॉकवर रात्री बाजार भरत असल्याने कारवाईसाठी तैनात केलेली पथकेही कुचकामी ठरली आहेत. डोंबिवलीला पुन्हा फेरीवाल्यांचे अतिक्रमण दिसू लागले असताना कल्याणची स्थिती ही फारशी वेगळी नाही.

टॅग्स :hawkersफेरीवालेkdmcकल्याण डोंबिवली महापालिकाMNSमनसे