शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदेसेनेत प्रवेश करणाऱ्या नेत्याचा प्रताप; पक्षप्रवेशात ४०-५० नावे बोगस निघाली, प्रकरण काय?
2
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
3
"लॉकेट आणलंय, डोळे बंद कर"; पत्नीने सरप्राइजसाठी डोळे बंद करताच पती झाला राक्षस, केले २० वार!
4
"भाऊ, मी यावेळी राखी बांधू शकणार नाही"; पती आणि सासरच्यांना कंटाळून महिलेने संपवलं जीवन
5
इथेनॉल मिश्रित पेट्रोल वाहनांचे इंजिन, मायलेजवर परिणाम करते? लोकांमध्ये दावे सुरु होताच मंत्रायलाने केला खुलासा...
6
गुंतवणूकदारांसाठी 'सुवर्ण संधी'! 'हे' ५ स्टॉक खरेदी करण्याचा ब्रोकरेज फर्मचा सल्ला, काय आहे टार्गेट प्राइस?
7
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
8
अमेरिकेला भारताची गरज, डीलसाठीच ट्रम्प यांची धडपड; एक्सपर्टनं सांगितली इन्साईड स्टोरी
9
त्यानं लग्नात दिलेलं वचन पाळलं, पत्नीला मृत्यूच्या दारातून खेचून आणलं! पण...; ऐकून डोळ्यांत येईल पाणी
10
बेलापूर न्यायालयामध्ये थेट लिंबू-मिरचीचा उतारा; दुसऱ्यांदा घडली घटना; या प्रकारानंतर एक न्यायाधीश चार दिवस रजेवर
11
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
12
Share Market Opening: शेअर बाजाराची रेड झोनमध्ये सुरुवात; मोठ्या घसरणीसह उघडले हे स्टॉक्स
13
ऐश्वर्यासोबत घटस्फोट घेतल्यानंतर धनुष या मराठमोळ्या अभिनेत्रीला करतोय डेट?, अशी मिळाली हिंट
14
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
15
मीरारोडच्या 'केम छो' बारवर धाड; १८ बारबालांसह एकूण ३६ जणांवर गुन्हा दाखल
16
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
17
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
18
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
19
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर

डोंबिवलीतील फराळ अमेरिकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2018 00:29 IST

शिक्षण आणि नोकरीनिमित्त परदेशात विशेषत: अमेरिकेत गेलेल्या मंडळींसाठी डोंबिवलीतील फराळविक्रेत्यांकडे आॅर्डर नोंदवली गेली आहे.

- जान्हवी मोर्ये डोंबिवली : नोकरी, व्यवसाय तसेच कौटुंबिक जबाबदाऱ्यांमुळे महिलांना घरी दिवाळीचा फराळ करणे जमत नाही. त्यामुळे तयार फराळ खरेदी करण्यावर त्यांचा भर आहे. शिक्षण आणि नोकरीनिमित्त परदेशात विशेषत: अमेरिकेत गेलेल्या मंडळींसाठी डोंबिवलीतील फराळविक्रेत्यांकडे आॅर्डर नोंदवली गेली आहे. यंदा फराळाच्या किमती २० टक्क्यांनी वाढल्या आहेत, अशी माहिती फराळविक्रेत्यांनी दिली आहे.फराळविक्रेते श्रीपाद कुलकर्णी म्हणाले, महागाई, वाहतूक तसेच कागदी पिशव्यांचा खर्च वाढल्याचा फटका विक्रेत्यांना बसत आहे. त्यामुळे यंदा तयार फराळाच्या किमतीत २० टक्क्यांनी वाढ झाली आहे. दिवाळी तोंडावर आली तरी फराळाला जास्त मागणी नाही. दिवाळीच्या दोन दिवस आधी मागणी वाढू शकते. डोंबिवलीतील तयार फराळाला स्थानिक बाजारपेठेबरोबरच अमेरिकेत जास्त मागणी आहे. त्यातुलनेत दुबई व युरोपीय देशांत फराळाला मागणी कमी आहे. त्याचे कारण तेथे आता फराळाचे पदार्थ मिळत आहेत.फराळविक्रेते नाख्ये यांनी सांगितले की, चिवडा, शंकरपाळी व बेसनलाडूला जास्त मागणी आहे. मिठाईमध्ये काजूकतली, सोनपापडी आणि विविध फ्लेव्हर्सच्या मिठाईला मागणी आहे. त्यात काजू, चिकू, आंबा, चॉकलेट, अंजीर आदी १० ते १२ प्रकार आहेत.डोंबिवलीतील सुनील शेवडे यांच्याकडील फराळाला परदेशातून मागणी आहे. तेथे शिक्षणासाठी गेलेले विद्यार्थी आणि नोकरीसाठी गेलेल्यांना घरचा फराळ चाखता यावा, यासाठी अनेक जण शेवडे यांच्याकडील फराळ कुरिअरद्वारे तेथे पाठवत आहेत. विद्यार्थ्यांसाठी वेगळा पॅक उपलब्ध आहे. ग्राहकांच्या देखतच ते फराळाचा पॅक तयार करून देत आहेत. शेवडे यांच्याकडे कोंथिबीर चिवडा आहे. कोंथिबीर डी-हायड्रेड केली जाते. त्यामुळे तो जास्त दिवस टिकतो, असे ते म्हणाले. फराळविक्रेते सुभाष पाटील म्हणाले, चकली, अनारसे, बेसनलाडू या पदार्थांना जास्त मागणी आहे. सणाच्या तोंडावर भाववाढ केली जाते, अशी ग्राहकांची ओरड असते. त्यामुळे आम्ही भाववाढ केलेली नाही. फराळावरदेखील १२ ते २८ टक्के जीएसटी असून त्याचा फटका ग्राहकांना बसत आहे.२३ प्रकारचे लाडू : विक्रेते श्रीजय कानिटकर म्हणाले, रवा, बेसन, गुलकंद, बाजरी, गूळपापडी, मोतीचूर, डिंक, शिंगाडा, पौष्टिक चुरमुरालाडू असे विविध प्रकारचे २३ लाडू आमच्याकडे उपलब्ध आहेत. दिवाळीत गिफ्ट देण्यासाठी लाडूंचा साधा पॅक, व्हरायटी पॅक आणि प्रीमियम पॅकही तयार केले आहेत. साध्या पॅकमध्ये रवा-नारळ, बेसन आणि गुलकंदी लाडू आहेत. व्हरायटी आणि प्रीमियम पॅकमध्ये सात प्रकारांच्या लाडूची चव चाखता येते. महाराष्ट्राची खाद्यसंस्कृती टिकवून ठेवण्याचा आमचा मुख्य उद्देश आहे. बंगाली मिठाईपेक्षा शरीरासाठी हे विविध लाडू पौष्टिक आहेत. दिवाळीपर्यंत लाडूंच्या पाच हजार आॅर्डर येतील, असा अंदाज आहे.

टॅग्स :DiwaliदिवाळीAmericaअमेरिकाdombivaliडोंबिवली