शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

‘ग्रंथ तुमच्या दारी’ला डोंबिवलीकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

By admin | Updated: April 23, 2017 04:00 IST

या योजनेत तब्बल एक लाख २० हजार पुस्तकांच्या १२०० पुस्तकपेट्या देशविदेशात असून त्यापैकी ११ पुस्तकपेट्या सध्या डोंबिवलीत आहेत. येत्या महिनाभरात त्यात वाढ

- जान्हवी मोर्ये, डोंबिवलीया योजनेत तब्बल एक लाख २० हजार पुस्तकांच्या १२०० पुस्तकपेट्या देशविदेशात असून त्यापैकी ११ पुस्तकपेट्या सध्या डोंबिवलीत आहेत. येत्या महिनाभरात त्यात वाढ केली जाणार आहे. महाराष्ट्रातील वाचनालयास दीडशे वर्षांची परंपरा आहे. ग्रंथालयात जाऊन पुस्तक बदलण्यास आजकालच्या धकाधकीच्या जीवनात शक्य होत नाही. परिणामी, शहरातील वाचनाचे प्रमाण कमी होत असल्याचे दिसून येते. वाचनाची आवड असलेल्या परंतु वाचनालयात जाणे अशक्य असलेल्या वाचकांना त्याच्या मनाजोगे पुस्तक त्याच्या घरपोच करण्यात आले, तर वाचन चळवळ नक्कीच वाढीस लागेल. या संकल्पनेतूनच ‘ग्रंथ तुमच्या दारी’ या उपक्रमाचा जन्म झाला. मित्रमैत्रिणींना वाढदिवसाच्या केवळ शुभेच्छा न देता भेट स्वरूपात पुस्तक दिल्यास त्याचा उपयोग होईल, असा विचार पुढे आला. प्रतिष्ठानकडे पुस्तकांसाठी निधी जमा करण्यास नाशिकमधून सुरुवात केली. मित्रमैत्रिणांचा गट, नात्यागोत्यातील मंडळींचा गट तयार केला. यातूनच ‘ग्रंथ आपल्या दारी’ उपक्रमाला प्रारंभ झाला. या उपक्रमाची २००९ मध्ये मुहूर्तमेढ रोवली गेली. ग्रंथालय आणि वाचक यांच्यातील अंतर मिटवण्याचा प्रयत्न या उपक्रमाने केला. आता १२०० च्या वर पुस्तकपेट्यांची संख्या पोहोचली आहे. या उपक्रमात पावणेदोन कोटी रुपये किमतीची ग्रंथसंपदा आहे. सहकारी बँका, पतपेढ्या, ग्रंथप्रकाशक या ग्रंथपेट्यांचे प्रायोजक असून काही वैयक्तिक वाचकांनी स्वत:चा वाढदिवस, लग्नाचा वाढदिवस, एकसष्टी, सहस्रचंद्रदर्शन किंवा आप्तजनांच्या स्मरणार्थ अशा दिलेल्या देणग्यांतून ग्रंथपेट्या तयार झाल्या आहेत. १०० पुस्तकांची एक पेटी तयार केली. त्यासाठी एक समन्वयक नेमून ती पुस्तके वाचकांपर्यंत पोहोचवली जातात. स्वदेश ते परदेशात सातासमुद्रापार...नाशिक, अहमदनगर, औरंगाबाद, पुणे, ठाणे, वाई, सातारा, कराड, फलटण, कोल्हापूर, सोलापूर, नागपूर, जळगाव, धुळे, कोकण, नवी मुंबई, मुंबई, बडोदा, सिल्व्हासा, बेळगाव इथपासून ते दिल्लीपर्यंत ग्रंथपेट्या पोहोचवल्या जातात. एवढेच नव्हे, तर सातासमुद्रापार दुबई, टोकिओ, नेदरलँड, स्वित्झर्लंड, अ‍ॅटलांटा आणि आॅस्ट्रेलिया या देशांतील मराठी माणसांनाही या उपक्रमातील ग्रंथपेट्यांनी आकर्षित केले आहे. नाशिक जिल्ह्यातील अतिदुर्गम अशा आदिवासी भागातील पाड्यांवरही ग्रंथपेट्या पाठवल्या जातात. नाशिक, ठाणे, पुणे, नागपूर, मुंबई येथील कारागृहांतील बंदिवानांनीही पुस्तके वाचावीत, यासाठी तिथेही पुस्तकपेट्या धाडण्यात येतात. दवाखाने आणि पोलीस ठाणे याठिकाणीही पुस्तकपेट्यांची देवाणघेवाण केली जाते. पुढचे पाऊल...: डोंबिवलीतील पै फ्रेण्ड्स लायब्ररीने पुस्तक आदानप्रदान प्रदर्शनाचे अनोखे आयोजन केले होते. भारतातील पहिलेच अशा प्रकारचे प्रदर्शन होते. त्यात वाचकांनी ५० हजार पुस्तके जमा केली, तर ३५ हजार पुस्तके वाचनासाठी नेली. ३५ हजार पुस्तकांचे आदानप्रदान झाले. उरलेली १५ हजार पुस्तके इतर वाचनालयांस दिली जाणार आहे. त्याच धर्तीवर ग्रंथ तुमच्या दारी हा उपक्रम राबवणाऱ्या कुसुमाग्रज प्रतिष्ठानतर्फे ६ व ७ मे रोजी घंटाळी येथे पुस्तक आदानप्रदान उपक्रम राबवला जाणार आहे. या उपक्रमात २०० ते ३०० पुस्तके मांडण्यात येणार आहेत.यातील आपल्याला आवडणारी पुस्तके वाचकांना मोफत घेऊन जाता येणार आहेत. त्या बदल्यात त्यांनी एक पुस्तक घरातून आणून जमा करायचे आहे. यातून पुस्तक देवाणघेवाण उपक्रमाला आणखी प्रोत्साहन मिळून वाचकांपर्यंत जास्तीतजास्त पुस्तके पोहोचण्यास मदत होणार आहे.