शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
2
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
3
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
4
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
5
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
6
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
7
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
8
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
9
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
10
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
11
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
12
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
13
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
14
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
15
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
16
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय
17
त्र्यंबकेश्वर: पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या गुंडांचा तातडीने बंदोबस्त करा; काँग्रेसची मागणी
18
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
19
याला म्हणतात धमाका शेअर...! केवळ 2 वर्षांत दिला 900 टक्के परतावा, आजही करतोय मालामाल; तुमच्याकडे आहे का?
20
सचिन तेंडुलकरसोबत अफेअरची चर्चा, आता अनेक वर्षांनंतर शिल्पा शिरोडकर सोडलं मौन, म्हणाली...

विद्यार्थ्यांसह डोंबिवलीकर रमले फुलापाखरांच्या प्रदेशात : शनिवार-रविवार बालभवनमध्ये प्रदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2017 15:13 IST

फुलपाखरांच्या प्रदेशात या संकल्पनेवर आधारीत छायाचित्रांचे विनामूल्य प्रदर्शन बालभवन,डोंबिवली पूर्व येथे भरवण्यात आले आहे. शनिवार-रविवार असे दोन दिवस सकाळी ११ ते रात्री ८ या कालावधीत डोंबिवलीकरांना त्याचा आनंद लुटता येणार आहे. शनिवारी या उपक्रमाच्या शुभारंभालाच प्रदर्शन बघण्यासाठी अबालवृद्धांनी गर्दी केली होती. शहरातील ज्ञानमंदिर, आजदेगाव जिल्हा परिषद शाळा, टिळकनगर शाळा, शिवाई बालक मंदिर या शाळांच्या हजारो विद्यार्थ्यांनी या प्रदर्शनाचा आनंद लुटला.

ठळक मुद्दे फुलपाखरांसह पतंगांच्या ८०० छायाचित्रांचा समावेशज्ञानमंदिर, आजदेगाव जिल्हा परिषद शाळा, टिळकनगर शाळा, शिवाई बालक मंदिर शाळांच्या विद्यार्थ्यांनी प्रदर्शनाचा आनंद लुटला

डोंबिवली: फुलपाखरांच्या प्रदेशात या संकल्पनेवर आधारीत छायाचित्रांचे विनामूल्य प्रदर्शन बालभवन,डोंबिवली पूर्व येथे भरवण्यात आले आहे. शनिवार-रविवार असे दोन दिवस सकाळी ११ ते रात्री ८ या कालावधीत डोंबिवलीकरांना त्याचा आनंद लुटता येणार आहे. शनिवारी या उपक्रमाच्या शुभारंभालाच प्रदर्शन बघण्यासाठी अबालवृद्धांनी गर्दी केली होती. शहरातील ज्ञानमंदिर, आजदेगाव जिल्हा परिषद शाळा, टिळकनगर शाळा, शिवाई बालक मंदिर या शाळांच्या हजारो विद्यार्थ्यांनी या प्रदर्शनाचा आनंद लुटला.या प्रदर्शनाचा शुभारंभ कल्याण बार कौन्सिलचे माजी अध्यक्ष अ‍ॅड. शिरिष देशपांडे, इन्डो अमाईन या रासायिनिक कंपनीचे संचालक विजय पालकर, भाजपाचे नगरसेवक महेश पाटील व रोटरीचे पदाधिकारी आदींच्या उपस्थितीत करण्यात आला. महाराष्ट्रात प्रथमच हे छायाचित्र प्रदर्शन डोंबिवलीत भरवण्यात आले असून भ्रमंतीप्रिय, कलारसिक डोंबिवलीकरांनी ते बघण्यासाठी आवर्जून यावे असे आवाहन डॉ. महाजन यांनी केले. निसर्गाच्या सानिध्यात दोन दिवस, ते ही हाकेच्या अंतरावर आपल्याच शहरात डॉ. राजेश महाजन यांच्यामुळे ही संधी मिळाली आहे. डोंबिवलीकरांनी या प्रदर्शनाला आवर्जून भेट द्यावी. डॉ. महाजन यांचा होसला वाढवावा असे आवाहन अ‍ॅड. देशपांडे यांनी केले. छंदाला मोल नतसो, त्यामुळेच हे प्रदर्शन विनामूल्य असून डोंबिवलीकरांनी त्याचा आनंद लुटावा असे नगरसेवक पाटील म्हणाले. वैद्य भाऊ सुळे यांनीही या प्रदर्शनाला आवर्जून भेट दिली, छायाचित्र संकलनाबद्दल डॉ. महाजन यांचे कौतुक केले.प्रदर्शनातील वैशिष्ठ्यांसंदर्भात डॉ. महाजन म्हणाले की, महाराष्ट्रातील कोकणात चिपळुण, रत्नागिरी, महड, जळगाव, डोंबिबली, नासिक, पुणे, लोणावळा, खंडाळा, ठाणे आदी भागांमध्ये प्रवास, भ्रमंतीमधून गेल्या आठ वर्षामध्ये डॉ. महाजन यांनी १५०० हून अधिक छायाचित्र काढली, त्यांचे संकलन केले. त्यातील निवडक ८००हून अधिक विविध जाती-प्रजातींची फुलपाखर, पतंग, किटकांच्या छायाचित्रांचा समावेश प्रदर्शनामध्ये करण्यात आला आहे. संकलीत केलेले छायाचित्र आणि त्याखाली तपशीलात माहिती देण्यात आली आहे. त्यामध्ये २०० विविध रंगांची फुलपाखरे, ४००प्रकारचे,पतंग, यासह २०० प्रकारचे नाकतोडे, चतुर, कोळी आदीं किटकांचा समावेश आहे. जगात अतिशय दूर्मिळ असा खेकड्यांना खाणारा बेडकाचा देखिल फोटो या ठिकाणी प्रदर्शनात मांडण्यात आला आहे. हा बेडुक भारतात केवळ महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यात, उडीसा येथे तर तैवान आणि चीन, फिलीपाईन्स या देशांमध्येच आढळत असल्याचे डॉ. महाजन यांनी आवर्जून सांगितले.============

टॅग्स :kalyanकल्याणdombivaliडोंबिवलीthakurliठाकुर्लीSchoolशाळाzp schoolजिल्हा परिषद शाळा