शहरं
Join us  
Trending Stories
1
मल्लिकार्जुन खर्गे यांच्या RSS वर बंदी घालण्याच्या मागणीवर अमित शाह यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले
2
एक काेटी वाहनांना नाही ‘हाय सिक्युरिटी नंबरप्लेट’! एकूण ६८.२४ लाख चालकांनी दिला प्रतिसाद
3
कसली थंडी..? आता अनुभवा ‘नोव्हेंबर हीट’! मुंबईसह राज्यभरात अवकाळी पावसाचीही शक्यता
4
दुलारचंद यादव हत्याकांड: नाट्यमय घडामोडींनंतर अनंत सिंह यांना अटक, रात्री पोहोचले पोलीस, त्यानंतर...
5
आजचे राशीभविष्य, ०२ नोव्हेंबर २०२५: हाती पैसा, यश-कीर्ती लाभेल; पण हट्टीपणा सोडावा
6
महिला वर्ल्डकप: आज घडणार इतिहास; प्रथमच जिंकेल भारत किंवा दक्षिण आफ्रिका; उत्सुकता शिगेला
7
कुष्ठरोगाचे निदान झाले रे झाले की, रुग्णनाेंद बंधनकारक; सार्वजनिक आरोग्य विभागाचा निर्णय
8
आयोगाचा सर्व्हर कुणाच्या कार्यालयात? कुणाची नावे काढायची, कुठली टाकायची हा कट सुरू: ठाकरे
9
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभच लाभ, पद-पैसा वाढ; ६ राशींना काहीसा ताप, तुमची रास कोणती?
10
चार हजार ग्राहकांनी वाढवली २२ मेगावॅट क्षमता; २ हजार ४६० औद्योगिक ग्राहकांचाही समावेश
11
मूक आंदोलन करून भाजपने केला पलटवार! ...हा तर मविआचा नवा कट- रवींद्र चव्हाण
12
जय हरी विठ्ठल.. एकनाथ शिंदे यांनी सपत्नीक केली विठ्ठल-रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
13
दुबार मतदार दिसताच बडवा; मविआ-मनसेचा महाएल्गार! मतदार यादीतील घोळाबाबत मुंबईत निषेध मोर्चा
14
गाव पोटा.. व्यवसाय शेती अन् वालेगावकर दाम्पत्याला मिळाला उपमुख्यमंत्र्यांसोबत महापूजेचा मान
15
‘तुमच्या विमानात आज १९८४ मद्रास स्टाईल बॉम्ब अटॅक होणार आहे’; मुंबईत इमर्जन्सी लँडिंग
16
२४ मोबाईल खेचणाऱ्या दोन आरोपींना अटक; आचोळेच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांची कामगिरी
17
ठेकेदारांचे कामबंद, हिवाळी अधिवेशन नागपूर की मुंबईत? बांधकाम खाते संभ्रमात
18
Ganesh Kale Pune: आधी चार गोळ्या झाडल्या, नंतर डोक्यात कोयत्याने वार; काळेच्या हत्येचा पोलिसांनी सांगितला थरार
19
अमेरिका 'या' देशावर स्ट्राईक करण्याच्या तयारीत, ट्रम्प यांनी दिला आदेश?; रिपोर्टमधून खुलासा
20
चीनसोबत मिळून रशियानं दिला भारताला दगा?; ताजिकिस्तानात रचलं षडयंत्र, वाचा इनसाईड स्टोरी

डोंबिवलीत जनजीवन सुरळीत, शाळाही झाल्या सुरु : मध्य रेल्वेची वाहतूक रुळावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2017 08:58 IST

ओखी चक्रीवादळामुळे सोमवार रात्रीपासून सुरु झालेल्या पावसाने मंगळवारी दिवसभर कल्याण-डोंबिवली परिसरात पावसाची बरसात केली. अचानक आलेल्या पावसामुळे सर्वसामान्यांची त्रेधातिरपीट उडालेली होती, तर तापमानात घट झाल्याने या शहरांंमध्ये वातावरणात प्रचंड गारठा पसरला होता. मात्र बुवधारी पहाटेपासूनच पावसाने उघडीप घेतली होती, हवामानातही गारवा कमी झाला होता, आणि उकडायला सुरुवात झाली होती. मंगळवारच्या तुलनेत बुधवारी जनजीवन सुरळीत होते.

ठळक मुद्दे पावसाने घेतली उघडीप-आकाश ढगाळलेलेच पहाटेपासूनच रेल्वे रुळावर असल्याने चाकरमान्यांसह चैत्यभूमीवर जाणा-या अनुयायांना दिलासा गारठा कमी झाला अन् उकाडा जाणवू लागलामहावितरणचे मात्र सतर्कतेचे आदेश

डोंबिवली: ओखी चक्रीवादळामुळे सोमवार रात्रीपासून सुरु झालेल्या पावसाने मंगळवारी दिवसभर कल्याण-डोंबिवली परिसरात पावसाची बरसात केली. अचानक आलेल्या पावसामुळे सर्वसामान्यांची त्रेधातिरपीट उडालेली होती, तर तापमानात घट झाल्याने या शहरांंमध्ये वातावरणात प्रचंड गारठा पसरला होता. मात्र बुवधारी पहाटेपासूनच पावसाने उघडीप घेतली होती, हवामानातही गारवा कमी झाला होता, आणि उकडायला सुरुवात झाली होती. मंगळवारच्या तुलनेत बुधवारी जनजीवन सुरळीत होते, शाळाही सुरु असल्याने नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडत दिनचर्येला सुरुवात केली.काल मध्य रेल्वेची लोकलसेवा धुक्यामुळे सकाळच्या सत्रात १० ते १५ मिनिटे विलंबाने धावत होती, पण बुधवारी मात्र पहाटेपासूनच रेल्वे रुळावर असल्याने चाकरमान्यांसह चैत्यभूमीवर जाणा-या लाखो अनुयायांना दिलासा मिळाला.महावितरणने मात्र बुधवारीही त्यांच्या कर्मचा-यांना सतर्कतेचा इशारा देत वीजपुरवठा बाधित होणार नाही, नागरिकांची गैरसोय होणार नाही यावर भर द्यावा असे आदेश दिले होते. दरम्यान, सोमवारी रात्रीपासून सुरु असलेल्या पावसामुळे डोंबिवली पश्चिमेकडील कोपररोड भागात मध्यरात्री पावणेबारा वाजता वीजपुरवठा खंडीत झाला होता, तासाभरात महावितरणच्या कर्मचा-यांनी आवश्यक ती दुरुस्ति करुन वीजपुरवठा सुरळीत केला. मंगळवारी दिवसभरात रामनगर, दत्तनगर आदी भागात काही ठिकाणी वीजपुरवठा खंडीत झाला होता. मात्र सुमारे वीस मिनिटे ते अर्धा तासात पुन्हा सुरळीत झाला. दिवसभर मुख्य वीजपुरवठा केंद्रात गारठ्यामुळे स्वीच ट्रीप होण्याच्या घटना घडल्या, पण महावितरणच्या कर्मचा-यांनी सतर्कत दाखवत तात्काळ वीज पुरवठा सुरळीत केला होता. दिवसभरात कुठेही फार वेळ वीजपुरवठा खंडीत होता अशा घटना घडल्या नाहीत. बुधवारीही पावसाची शक्यता असून रात्रंदिवस वीजपुरवठ्यावर लक्ष ठेवणे, यासह अन्य आपात्कालीन यंत्रणेने सतर्क रहावे असे आदेश देण्यात आल्याची माहिती महावितरणचे कार्यकारी अभियंता डी. दिक्कड यांनी दिली. बाजीप्रभु चौकातील मेन फिडरमध्ये तांत्रिक बिघाड झाला होता, पण तात्काळ दुस-या फिडरमध्ये लाइनमध्ये वीजपुरवठा सुरु करण्यात आला. महािवतरणचा वीजपुवठा खंडीत झाल्याने रामनगर, बाजीप्रभु चौक, भगतसिंग रोड आदी ठिकाणी इंटरनेट सुविधेत अडथळे आले होते. त्यामुळे दिवसभर काही ग्राहकांना इंटरनेट सुविधा सुरळीतपणे मिळू न शकल्याने नाराजी व्यक्त झाली होती, बुधवारी सकाळपासून ती सेवाही सुरळीत असल्याने ग्राहकांना दिलासा होता. मंगळवारी दिवसभर तसेच रात्रीच्या कमी अधिक पावसात कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात कुठेही नुकसान झाले नसल्याची माहिती अग्नीशमन दलाचे अधिकारी दिलीप गुंड यांनी दिली होती. बुधवारी सकाळी पावसाने उघडीप घेतली असली तरी महापालिकेच्या आपात्कालीन यंत्रणेलाही सज्ज राहण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. 

टॅग्स :dombivaliडोंबिवलीkalyanकल्याणbadlapurबदलापूरthakurliठाकुर्ली