शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

बांधकाम व्यावसायिकावर डोंबिवलीत गोळीबार, उसने पैसे परत मागितल्याच्या रागातून कृत्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2018 04:03 IST

उसने पैसे परत मागितल्याच्या रागातून नांदिवलीत राहणाºया एका बांधकाम व्यावसायिकाच्या घरावर २० ते २५ जणांनी शुक्रवारी मध्यरात्री सशस्त्र हल्ला करत गोळीबार केला. मात्र, त्यात कोणीही जखमी झाले नाही. याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात २० ते २५ जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

डोंबिवली : उसने पैसे परत मागितल्याच्या रागातून नांदिवलीत राहणाºया एका बांधकाम व्यावसायिकाच्या घरावर २० ते २५ जणांनी शुक्रवारी मध्यरात्री सशस्त्र हल्ला करत गोळीबार केला. मात्र, त्यात कोणीही जखमी झाले नाही. याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात २० ते २५ जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, सांस्कृतिक नगरी असलेल्या डोंबिवलीतील गोळीबाराचे सत्र संपत नसल्याचे यावरून स्पष्ट झाले आहे.गीतेश पाटील यांनी महेंद्र खोत (रा. आगासन, दिवा) यांना साडेतीन लाख रुपये उसने दिले होते. ते पैसे पाटील यांनी त्यांच्याकडे परत मागितले. त्या रागातून खोत हे आगासन येथे राहणारे केजू मुंडे, निलेश मुंडे, शरद मुंडे तसेच सोनारपाडा येथील १५ ते २० साथीदारांना घेऊन मध्यरात्री १ वा.च्या सुमारास पाटील यांच्या घरी आले. स्टम्प, हॉकीस्टीक, तलवारी घेऊन आलेल्या या हल्लेखोरांनी पाटील यांचा दरवाजा ठोठावला. या वेळी पाटील टीव्ही पाहण्यात मग्न होते. हल्लेखोरांनी त्यांना बाहेर येण्यास सांगितले. ‘आज जिवंत सोडणार नाही. त्याचा मुडदा पाडू तेव्हाच घरी जाऊ’, असे ओरडत पाटील यांच्या घराच्या खिडकीच्या काचा फोडल्या. तर, एकाने पिस्तूलने पाटील यांच्या दिशेने गोळीबार करत त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न केला. या वेळी पाटील यांची आई घराचा दरवाजा उघडून बाहेर गेली असता त्यांनाही मारहाण करण्यात आली. या हल्लेखोरांना पाटील यांचे मित्र समजावत असताना हल्लेखोरांतील एकाने त्याच्याजवळील पिस्तूलने हवेत दोनदा गोळीबार केला. त्याचबरोबर पाटील यांच्या मदतीला येणाºयास जिवंत सोडणार नाही, अशी धमकी दिल्याचे पाटील यांचे म्हणणे आहे.याप्रकरणी पाटील यांच्या फिर्यादीवरून मानपाडा पोलीस ठाण्यात २० ते २५ जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

टॅग्स :dombivaliडोंबिवली