शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

डोंबिवली होणार ई-कचरामुक्त, ७१३ किलो कचरा जमा

By admin | Updated: May 2, 2016 01:14 IST

मानवी जीवनाला सगळ््यात धोका आहे तो ई-कचऱ्याचा. त्यावर शास्त्रोक्त पद्धतीने प्रक्रिया करुन त्याची विल्हेवाट लावली जात नाही. व्हीजन डोंबिवली उपक्रमातंर्गत शहर ई कचरा मुक्त करण्यासाठी

डोंबिवली : मानवी जीवनाला सगळ््यात धोका आहे तो ई-कचऱ्याचा. त्यावर शास्त्रोक्त पद्धतीने प्रक्रिया करुन त्याची विल्हेवाट लावली जात नाही. व्हीजन डोंबिवली उपक्रमातंर्गत शहर ई कचरा मुक्त करण्यासाठी रविवारी उपक्रम राबविला. या उपक्रमातंर्गत ७१३ किलो वजनाचा ई कचरा गोळा करण्यात आला. हा कचरा नागरिकांनी स्वत:हून शिबिरात आणून दिला. जमा झालेल्या कचऱ्यावर पुण्यातील कुलदीप ई स्क्रॅप मटेरियल ही कंपनी शास्त्रोक्त प्रक्रिया करणार आहे. शहरातील के. बी. वीरा शाळेत ई कचरा शिबिर झाले. या उपक्रमाची सुरुवात आमदार रवींद्र चव्हाण यांनी स्वत: ई कचरा देऊन केली. नागरीकांनी संगणक, टेपरेकॉर्डर, मोबाईल, की- बोर्ड आदी इलेक्ट्रॉनिक्स वस्तू आणून दिल्या. या प्रकल्पाचे प्रमुख डॉ. उल्हास कोल्हटकर यांनी सांगितले की, वापरात नसलेल्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तू या घातक असतात. या ई कचऱ्याची ८० टक्के विल्हेवाट ही अशास्त्रीय पद्धतीने लावली जाते. एकतर हा कचरा जाळला जातो. त्यातून अनेक विषारी वायू बाहेर पडतात. ते नागरिकांच्या आरोग्यासाठी घातक आहे. काहीवेळा हा कचरा जमिनीत पुरला जातो. त्यातील धातू भूगर्भातील पाण्यात मिसळतात. तेच पाणी आपल्या शरीरात गेले की अनेक आजार होतात, असे ते म्हणाले. रक्ताच्या कर्करोगापासून मेंदूच्या विकारापर्यंत माणूस बळी पडतो. व्हीजन डोंबिवली अंतर्गत ई कचरा मुक्त डोबिवली हे लक्ष्य डोळयासमोर ठेवले आहे. त्यात प्रामुख्याने स्वयंसेवकांचा गट तयार करणे, त्यांना दहा तासाचे प्रशिक्षण देणे, प्रदर्शन व चर्चासत्र भरविणे, ई कचऱ्यावर प्रक्रिया करणाऱ्या सरकारमान्य कंपन्यांना कचरा गोळा करुन देणे. त्यासाठी ई कचरा स्टेशन उभारणे हा चार कलमी कार्यक्रम हाती घेतला आहे. त्याची ही सुरुवात असल्याचे त्यांनी नमूद केले. यापूवी रोटरीच्या पुढाकाराने मे २०१४ मध्ये ई कचरा गोळा करण्याचे शिबिर झाले होते. त्यातून १.७ टन कचरा गोळा केला होता. आॅगस्ट २०१५ मध्ये झालेल्या शिबिरात १.३ टन कचरा गोळा झाला होता. डोंबिवली पूर्व व पश्चिम येथे ई कचरा स्टेशन सुरु करण्यासाठी जागा देण्याची मागणी डॉ. कोल्हटकर यांनी पालिकेकडे केली आहे. महापालिकेने या मागणीचा सकारात्मक विचार केला जाईल असे स्पष्ट केले. (प्रतिनिधी)महाराष्ट्र, आंध्र प्रदेश आघाडीवरभारतातील प्रमुख शहरांमध्ये ई कचरा निर्माण करण्यात मुंबई आघाडीवर आहे. मुंबईत २४ टक्के, दिल्लीत २१, बेंगळुरू १३ आणि पुण्यात १० टक्के ई कचरा तयार होतो. देशातील राज्यांचा विचार केला तर महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेश या दोन राज्याची ई कचरा निर्माण करण्यात आघाडी आहे. महिन्याला ५० टन कचऱ्यावर प्रक्रियाकुलदीप ई स्क्रॅप मटेरियलचे कंपनीचे प्रमुख अशोक भारस्कर यांनी सांगितले की, दररोज दीड टन ई कचऱ्यावर प्रक्रिया केली जाते. महिन्याला ५० टन कचऱ्यावर प्रक्रिया करण्याची प्रकल्पाची क्षमता आहे. देशात अशा प्रकारचा प्रकल्पच नाही. सध्या ही कंपनी गुजरात,आंध्र प्रदेश, राजस्थान राज्यातून ई कचरा आणून त्यावर प्रक्रिया करते.