शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

भारतीय संस्कृतिचे दर्शन घडवण्यासाठी, डोंबिवलीचे नृत्य कलाकार केंद्राकडून आॅस्ट्रेलियात!

By सुरेश लोखंडे | Updated: October 9, 2022 21:22 IST

या शिक्षकासह त्यांच्या विद्यार्थिनींनी भारत सरकारच्या वंदे भारत नृत्य स्पर्धेत सहभाग घेतला होता. त्यात यशस्वी झाल्यानंतर त्यांना १५ आॅगस्टच्या स्वातंत्र दिनी राजपथावरील संचलनात नृत्य अविस्काराची संधी मिळाली होती.

ठाणे: आझादी का अमृत महोत्सवाचे औचित्य साधून केंद्र शासनाकडून जागातील विविध देशात भारतीय संस्कृतिचे दर्शन घडवण्यात येत आहे. यासाठी नृत्य कलेत पारंगत असलेल्या देशातील कलाकरांची निवड केली जात आहे. त्यात डोंबिवली येथील भरत नाट्यम नृत्य शैलीत पारंगत असलेल्या पवित्रा अर्ट इंस्टिट्युटच्या नृत्य शिक्षकासह सात  विद्यार्थिंनींची निवड  झाली. ते आॅस्ट्रेलियासाठी तीन शहरांमध्ये नृत्य कला आविष्कार सादर करण्यासाठीे शुक्रवारी आॅस्ट्रेलियासाठी रवाना झाले आहेत.

या शिक्षकासह त्यांच्या विद्यार्थिनींनी भारत सरकारच्या वंदे भारत नृत्य स्पर्धेत सहभाग घेतला होता. त्यात यशस्वी झाल्यानंतर त्यांना १५ आॅगस्टच्या स्वातंत्र दिनी राजपथावरील संचलनात नृत्य अविस्काराची संधी मिळाली होती. त्यानंतर आता आॅस्ट्रिलयात भारताच्या संस्कृतिचे दर्शन घडवण्यासाठी ते भारताचे नेतृत्व करीत असल्याचे या पथकाचे प्रमुख नृत्य शिक्षक पवित्र भट यांनी लोकमतला सांगितले. आॅट्रिलियातील कॅनबेरा, मेलबॉर्न आणि सिडनी या तीन शहरात ६ ते १६ आॅक्टोंबर दरम्यान ते ‘भरत नाट्यम’ नृत्याचा सांस्कृतिक कार्यक्रम सादर करणार आहेत. यावेळी ‘संपूर्ण रामायण’चे दर्शन अवघ्या ४० मिनीटात भरत नाट्यमव्दारे आॅट्रिलियान नागरिकांना घडवणार आहेत.केंद्राच्या सांस्कृतिक मंत्रालयाने डोंबिवलीच्या या ‘भरत नाट्यम डान्स गृप’ पथक प्रमुख पवित्र कृष्ण भट्ट यांच्या नेतृत्वाखालील आठ विद्यार्थीनींना शासनाच्या खर्चाने आॅस्ट्रेलियाला पाठवले आहे. भारतीय सांस्कृतिक परिषदेकडून ठाणे डोंबिवलीसह जिल्ह्यातील ठिकठिकाणच्या विद्यार्थीनींमध्य आभा अथणीकर, जान्हवी वजरामकर, जिज्ञासा गिराडे,शालिन देशमुख, जान्हवी कदम, मनस्वी पांढरपट्टे, गरीमा चव्हाण आदी भरत नाट्यमच्या विद्यार्थीनी कलाकर आॅट्रिलियात भारताचे नेतृत्व कलेच्या माध्यमातून करीत असल्याचा अभिमान असल्याचे यातील एका विद्यार्थीनीचे पालक असलेले प्रकाश गिराडे यांनी लोकमतला सांगिते. 

टॅग्स :thaneठाणेdanceनृत्य