शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

डोंबिवली : पेव्हर ब्लॉकच्या कामात कोट्यवधींचा घोटाळा, रमेश म्हात्रेंचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2018 01:13 IST

शासकीय निधीचा वापर खाजगी जागेसाठी करता येत नाही परंतु, केडीएमसी परिक्षेत्रात हे नियम धाब्यावर बसवलेले दिसतात. नियम बाजूला सारून खाजगी सोसायट्यांमध्ये टाईल्स, पेव्हर ब्लॉकची कामे केल्याचा भांडाफोड केडीएमसीचे काँग्रेसचे माजी विरोधी पक्षनेते रमेश पद्माकर म्हात्रे यांनी केला आहे. त्यांनी याप्रकरणी महापालिका, बाजारपेठ पोलीस ठाणे आणि लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली आहे. दरम्यान, बाजारपेठ

डोंबिवली : शासकीय निधीचा वापर खाजगी जागेसाठी करता येत नाही परंतु, केडीएमसी परिक्षेत्रात हे नियम धाब्यावर बसवलेले दिसतात. नियम बाजूला सारून खाजगी सोसायट्यांमध्ये टाईल्स, पेव्हर ब्लॉकची कामे केल्याचा भांडाफोड केडीएमसीचे काँग्रेसचे माजी विरोधी पक्षनेते रमेश पद्माकर म्हात्रे यांनी केला आहे. त्यांनी याप्रकरणी महापालिका, बाजारपेठ पोलीस ठाणे आणि लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली आहे. दरम्यान, बाजारपेठ पोलिसांकडूनही या प्रकरणी चौकशीला प्रारंभ झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.कल्याण डोंबिवलीतील बहुतांश प्रभागांमध्ये पेव्हर ब्लॉकची कामे नियमबाह्य केल्याकडे म्हात्रे यांनी लक्ष वेधले आहे. तसेच ज्या ठिकाणी कामे मंजूर करण्यात आली, त्या कामाचा प्रशासकीय आदेश काढण्यात आला. मात्र, प्रत्यक्षात दुसºयाच ठिकाणी ही कामे करण्यात आल्याचे त्यांचे म्हणणे आहे. नगरसेवक अधिकारी आणि ठेकेदार यांनी संगनमत करून भ्रष्टाचार केल्याचा आरोप म्हात्रे यांचा आहे. रस्त्याच्या कामांमध्ये स्टोन पावडरचा वापर करून ही कामेही निकृष्ट दर्जाची केली असून गटाराची कामे करतानाही सुस्थितीतील गटारे तोडण्यात आली आहेत. तर अनेक ठिकाणी गटारांची नादुरूस्ती करून नवीन बील काढण्यात आल्याचे म्हात्रे यांचे म्हणणे आहे.विशेष बाब म्हणजे लाचलुचपत विभागाकडे केलेल्या तक्रारीवर या प्रकरणाची संबधित विभागाकडून चौकशी करावी असे पत्र लाचलुचपत विरोधी विभागाचे पोलीस अधीचक संग्रामसिंह निशाणदार यांनी पालिका आयुक्तांना पाठवले आहे. पण याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे म्हात्रे यांचे म्हणणे आहे.याप्रकरणातील संबंधित अधिकाºयांवर कारवाई व्हावी अशी मागणी म्हात्रे यांनी आयुक्त पी. वेलरासू यांच्याकडे केली आहे.पोलिसांकडून चौकशी सुरू -डोंबिवली पश्चिमेतील प्रभाग क्र ५५ नवागाव आनंदनगर मधील ठाकुरवाडी परिसरातील प्रदीप सोसायटी ते शिवाजी पार्क सोसायटीपर्यंत रस्ता तयार करून पायवाट करणे व पेव्हर ब्लॉक बसवणे या कामाचे प्रशासकीय आदेश काढण्यात आले होते.मात्र प्रत्यक्षात हे काम पंडीत दिनदयाळ रोडवरील एका खाजगी सोसायटीच्या आवारात करण्यात आले. मंजुरी एका ठिकाणची प्रत्यक्षात काम दुसरीकडे याचा भांडाफोड म्हात्रे यांनी माहितीच्या अधिकारात उघडकीस आणला आहे. या प्रकरणाची तक्रार बाजारपेठ पोलिसांकडून सुरू करण्यात आली आहे.

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिका