शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

डोंबिवलीत भगतसींग- फतेह अली रोडवर खड्डेच खड्डे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2018 17:34 IST

डोंबिवली शहरांतर्गत रस्त्यांवर खड्यांचे प्रमाण कमी होत नसल्याने वाहनचालकांसह वाहतूक पोलिस त्रस्त आहेत. ज्या रस्त्यावर अवघ्या दोन महिन्यांपूर्वी डांबरीकरण करुन पॅच मारले होते त्या रस्त्यांमध्ये पाण्याच्या लाइनसह केबल टाकण्यासाठी खोदकाम करण्यात आले. काम झाल्यावर खड्डे तातडीने बुजवण्यात आले असले तरीही डांबरीकरण मात्र करण्यात आलेले नाही.

ठळक मुद्दे केबल टाकण्यासह पाण्याच्या कनेक्शनसाठी खोदण्यात आले होते रस्ते हमरस्त्यावर वाहनचालकांची गैरसोय

डोंबिवली: शहरांतर्गत रस्त्यांवर खड्यांचे प्रमाण कमी होत नसल्याने वाहनचालकांसह वाहतूक पोलिस त्रस्त आहेत. ज्या रस्त्यावर अवघ्या दोन महिन्यांपूर्वी डांबरीकरण करुन पॅच मारले होते त्या रस्त्यांमध्ये पाण्याच्या लाइनसह केबल टाकण्यासाठी खोदकाम करण्यात आले. काम झाल्यावर खड्डे तातडीने बुजवण्यात आले असले तरीही डांबरीकरण मात्र करण्यात आलेले नाही. तसेच केबल जमिनीत टाकतांना नियमांचे पालन झाले आहे की नाही याबाबतचही प्रश्नचिन्ह उभे राहीले आहे.फतेह अलीरोडसह भगतसिंग रोडवर अवघ्या तीन दिवसांपूर्वी रातोरात रस्ते खणुन केबल टाकण्याचे काम झाले. त्या आधी काही दिवसांपूर्वी भगतसिंग रोडवर पाण्याची दोन ठिकाणी लाइन घेण्यात आल्या, त्यातील एका ठिकाणचा खड्डा अद्यापही पूर्णपणे भरण्यात आलेला नाही. त्यामुळे वाहनचालकांसह पादचा-यांची गैरसोय होत आहे. जेथे खड्डे खणले आहेत ते तातडीने बुजवण्याची केडीएमसीची नियमावली सांगते, पण त्यामार्गदर्शक तत्वांचे पालन मात्र न झाल्याचा त्रास वाहनचालकांसह नागरिकांना होत आहे. ज्या पद्धतीने रातोरात केबल टाकण्यात आली, तेवढ्याच तत्परतेने ते काम झाल्यावर तातडीने खड्डे बुजवून त्यावर डांबरीकरण का झाले नाही? असा सवाल उपस्थित होते आहे. महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागासह रस्ते आस्थापना विभागाने याकडे तातडीने लक्ष द्यावे अशी मागणी होत आहे.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाNitin Gadakriनितिन गडकरीEknath Shindeएकनाथ शिंदे