शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

डोंबिवलीत मायलेकाला डेंग्यू

By admin | Updated: September 23, 2016 03:06 IST

कल्याण शहरात एकाच कुटुंबातील तिघांना, तर डोंबिवलीत सहा जणांना डेंग्यूची लागण झाल्याची घटना ताजी असतानाच येथील टिळकनगरमधील सुयोग सभागृहाच्या

डोंबिवली : कल्याण शहरात एकाच कुटुंबातील तिघांना, तर डोंबिवलीत सहा जणांना डेंग्यूची लागण झाल्याची घटना ताजी असतानाच येथील टिळकनगरमधील सुयोग सभागृहाच्या परिसरातील हरी मुकुंद सोसायटीत राहणाऱ्या दीपाली दोशी व हेत दोशी या आईमुलाला डेंग्यूसदृश आजाराची लागण झाल्याचे समोर आले आहे. त्या दोघांना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीत एकाच घरातील अनेक व्यक्तींना डेंग्यूची लागण झाल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. काही दिवसांपूर्वी नांदिवली परिसरातील सर्वाेदय पार्क गृहसंकुलात १५ ते २० जणांना या आजाराने ग्रासले होते. तेथे राहणाऱ्या सोहम तावडे या १४ वर्षांच्या मुलाला मुलुंड येथील खाजगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. या गृहसंकुलाच्या मागील बाजूस असलेल्या सोसायट्यांमध्येही डेंग्यूचे रुग्ण आढळले होते. दरम्यान, टिळकनगर परिसरातील दोशी कुटुंबातील मायलेकाला डेंग्यूसदृश आजाराची लागण झाल्याची माहिती मिळताच महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी कीटकनाशकाची फवारणी केली. परिसरातील गटारांवरील झाकणे उघडी असल्याने डासांची मोठ्या प्रमाणावर पैदास होत असल्याचा आरोप येथील नागरिकांनी केला आहे. दरम्यान, पावसाळी वातावरणामुळे तापाचे रुग्ण वाढत आहेत. श्रावणातील ऊन-पावसाच्या खेळामुळे रुग्णांची संख्या जोमाने वाढली होती. त्यात व्हायरल तापासह डेंग्यू, मलेरिया आणि काविळीचे रुग्ण आहेत. आता परतीच्या पावसातही आजारांची ही स्थिती कायम आहे. पालिकेच्या शास्त्रीनगर आणि रुक्मिणीबाई रुग्णालयांच्या बाह्य रुग्ण विभागात तसेच खाजगी रुग्णालयांमध्ये मोठ्या प्रमाणात तापाचे रुग्ण उपचार घेत आहेत. डेंग्यू आणि मलेरियाबरोबर काविळ, कॉलरा, लेप्टोस्पायरोसीस, गॅस्ट्रो, टायफॉईड यांचे रुग्णही आढळत आहेत. गेल्या महिन्यात काविळीच्या रुग्णांमध्येही लक्षणिय वाढ झाली होती. त्यामुळे केडीएमसीने नुकत्याच झालेल्या गणेशोत्सवतही पथनाट्यातून साथीच्या आजारांवर जागृती करण्यात आली होती. परंतु परिस्थिती ‘जैसे थे’ राहिल्याचे चित्र आहे. (प्रतिनिधी)