शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
5
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
6
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
7
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
8
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
9
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
10
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
11
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
12
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
13
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
14
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
15
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
16
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
17
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
18
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
19
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
20
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

Dombivali: मध्य रेल्वेच्या स्थानकांवर प्री-फॅब्रिकेटेड सिने डोम उभारण्यासह चालवण्यासाठी मागवल्या निविदा 

By अनिकेत घमंडी | Updated: September 22, 2023 12:36 IST

Central Railway: मध्य रेल्वेच्या डोंबिवली, खोपोली, जुचंद्र आणि इगतपुरी स्थानकांवर प्री-फॅब्रिकेटेड सिने डोम उभारण्यासह चालवण्यासाठी निविदा मागवल्या आहेत.

- अनिकेत घमंडीडोंबिवली - मध्य रेल्वेच्याडोंबिवली, खोपोली, जुचंद्र आणि इगतपुरी स्थानकांवर प्री-फॅब्रिकेटेड सिने डोम उभारण्यासह चालवण्यासाठी निविदा मागवल्या आहेत.

त्यासंदर्भात एक खुली ऑनलाइन निविदा प्रकाशित करण्यात आली असून ती १२ ऑक्टोबर रोजी दु.३:०० वाजता बंद होईल.  दहा वर्षांच्या कालावधीसाठी डोंबिवली, खोपोली, जुचंद्र आणि इगतपुरी स्थानकांवर प्री-फॅब्रिकेटेड सिने डोम सेट अप आणि ऑपरेट करण्यासाठी ते नॉन-फेअर रेव्हेन्यू उत्पन्न मॉडेल अंतर्गत असेल.

प्रस्तावित सिने डोम हा ग्राहक,अभ्यागत, पाहुण्यांसाठी जेवण,नाश्ता, पेय्यांसह नवीनतम चित्रपट प्रदर्शित आणि माहितीपट आणि इतर सामग्री इ.सह चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी एक संपूर्ण व्यवस्था  असेल.  मात्र, कायमस्वरूपी बांधकाम करण्यास परवानगी दिली जाणार नाही.  सिने डोमचे व्यवस्थापन निविदाकार स्वतःच ऑपरेटर करतील.  गर्दीचे व्यवस्थापन करणे ही जबाबदारी परवानाधारकाची असेल असे मध्य रेल्वेच्या जनसंपर्क अधिकाऱयांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे जाहीर केले.

प्री-फॅब्रिकेटेड सिने डोमची स्थापना, संचालन, देखभाल आणि व्यवस्थापन ही जबाबदारी पूर्णत: परवानाधारकाची असेल आणि त्यासाठी लागणारा खर्च परवानाधारकाला करावा लागेल (त्यात उभारणीचा खर्च, प्री-फॅब्रिकेटेड सिने डोम संबंधित  वस्तू, संरक्षा आणि सुरक्षा, आवश्यक सुविधा, केबल टाकणे, विद्युत कनेक्शन, वीज वापर शुल्क, वीज जमा आणि इतर प्रासंगिक खर्च इ. समावेश आहे).  प्री-फॅब्रिकेटेड सिने डोमच्या उभारणीसाठी आणि ऑपरेशनसाठी वरील सर्व खर्च आणि आनुषंगिक खर्च परवानाधारकाने उचलावा लागेल.

निविदाकार स्थानाच्या आवश्यकतेनुसार प्री-फॅब्रिकेटेड सिने डोम उभारेल.  या उद्देशासाठी, ते स्वीकृती पत्र जारी केल्यापासून ३० दिवसांच्या आत सक्षम प्राधिकरणाकडून आवश्यक मंजुरीसाठी तपशीलवार लेआउट योजना/डिझाइन सादर करेल.  आवश्यकतेनुसार कोणतेही बदल सुचविण्याचा अधिकार रेल्वेने राखून ठेवला आहे.  मात्र, कायमस्वरूपी बांधकाम करता येणार नाही. वरील प्रत्येक ठिकाणी एकूण क्षेत्रफळ सुमारे ५,००० चौ.फू.

प्रतिवर्षी राखीव किंमत खालीलप्रमाणे आहेडोंबिवली – रु. ४७,८५,४००/-जुचंद्र - रु. ३५,८२,०००/- इगतपुरी – रु. १७,१०,४००/-   खोपोली - रु.  २३,३१,१००/- ई-निविदेत सहभागी होण्यासाठी बोलीदारांना रेल्वेच्या पोर्टलवर नोंदणी करावी लागेल असे सांगण्यात आले.

टॅग्स :dombivaliडोंबिवलीcentral railwayमध्य रेल्वे