शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर 6 महिन्यांत मर्सिडीज अथवा बीएमडब्ल्यू हवी असेल तर..." सरन्यायाधीश गवई यांचा नव्या वकीलांना सल्ला
2
मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात! कंटेनरचे ब्रेक फेल, अनेक वाहने एकमेकांवर धडकली...
3
Shubman Gill Record : गिलनं साधला मोठा डाव! इंग्लंडच्या मैदानात पाक दिग्गजाला 'धोबीपछाड'
4
"आम्ही खूप दुःखी..."; दिराने वहिनीला कुंकू लावलं अन् धबधब्यात घेतली उडी, प्रेमाचा भयंकर शेवट
5
IND vs ENG : जसप्रीत बुमराहचं 'शतक'; मँचेस्टर कसोटीतील न पटण्याजोगी गोष्ट
6
Asia Cup 2025 चे वेळापत्रक जाहीर! भारत पाकिस्तान पुन्हा एकाच गटात, 'या' दिवशी सामना
7
१४,२९८ पुरुषांना 'लाडकी बहीण'चा लाभ; अजित पवार म्हणाले, 'वसूल करणार, नाही दिले तर...'
8
"सरकार ही निरुपयोगी यंत्रणा, चालत्या गाडीला पंक्चर करण्याचं काम..."; नितीन गडकरींनी सुनावलं
9
बिहार निवडणुकीसाठी काँग्रेसची मोर्चेबांधणी, महाराष्ट्रातील या महिला खासदाराकडे सोपवली मोठी जबाबदारी
10
"बंदुकीच्या धाकाने बांगलादेशात ढकलले जातेय...!" बांगली भाषिक मुस्लिमांवरील कारवाईवरून ओवेसी भडकले
11
IND vs ENG : यशस्वीच्या पदरी लाजिरवाणा 'भोपळा'! साई आला अन् तोही फक्त 'दर्शन' देऊन गेला
12
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."
13
VIDEO: अरे देवा... माकडाने ट्रेकरला मध्येच गाठलं, आधी बॅग उचकली, मग पाठीवर चढलं अन् मग...
14
धक्कादायक! या डेटिंग ॲपवरून महिलांचे हजारो फोटो लीक, प्रायव्हसी आली धोक्यात
15
'संपत्तीचे पुरावे देतो चौकशी करा'; एकनाथ खडसे म्हणाले, 'महिलांबाबत गिरीश महाजनांचे नाव पुढे का येतं?'
16
फणस खाणं महागात पडलं, ड्रिंक अँड ड्राइव्हमध्ये पकडलं; चालकांसोबत नेमकं काय घडलं?
17
१ ऑगस्टपासून लागू होणार नवे नियम, क्रेडिट कार्ड, यूपीआय, एलपीजीसह होणार हे ६ बदल, खबरदारी न घेतल्यास खिसा होणार रिकामा
18
वाल्मिक कराडचा जेलमधून माझ्यासमोर एकाला फोन आला; अंबादास दानवेंचा खळबळजनक दावा
19
सॉवरेन गोल्ड बाँडची कमाल...! ८ वर्षांत दिला २५०% परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
20
Raja Raghuvanshi : "राजाचा आत्मा अजूनही भटकतोय", भावाचा मोठा दावा; हत्येच्या ठिकाणी कुटुंबाने केलं असं काही...

Dombivali: गोव्याचे शिवसंस्कृती ढोल ताशा पथक ठरले तालसंग्राम पर्व ४ चे मानकरी

By अनिकेत घमंडी | Updated: February 5, 2024 12:07 IST

Dombivali News: सांस्कृतिक राजधानी अशी ख्याती असलेल्या डोंबिवली शहरात आरंभ प्रतिष्ठान या ढोल ताशा पथकाने भरवलेल्या तालसंग्राम पर्व ४ या स्पर्धेत गोवा राज्यातील शिवसंस्कृती ढोल ताशा पथकाने प्रथम क्रमांक पटकावला. तर  द्वितीय मावळे प्रतिष्ठान, डोंबिवली, वसईच्या आविष्कार ढोल ताशा पथकाने तृतीय पारितोषिक पटकावले.

- अनिकेत घमंडीडोंबिवली - सांस्कृतिक राजधानी अशी ख्याती असलेल्या डोंबिवली शहरात आरंभ प्रतिष्ठान या ढोल ताशा पथकाने भरवलेल्या तालसंग्राम पर्व ४ या स्पर्धेत गोवा राज्यातील शिवसंस्कृती ढोल ताशा पथकाने प्रथम क्रमांक पटकावला. तर  द्वितीय मावळे प्रतिष्ठान, डोंबिवली, वसईच्या आविष्कार ढोल ताशा पथकाने तृतीय पारितोषिक पटकावले.अनुक्रमे प्रथम विजेत्या पथकाला दीड लाख रुपये, द्वितीय क्रमांक विजेत्या पथकाला एक।लाख आणि तृतीय विजेत्या पथकाला पन्नास हजार रुपये, अयोध्या येथील श्रीरामांची प्रतिकृती असलेली ट्रॉफी, प्रमाणपत्र आदी भेट देण्यात आले.

सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांची उपस्थिती यावेळी उल्लेखनीय होती. अशा स्पर्धा भरवणारे आरंभ हे पहिले पथक असून यंदा गोवा, मध्यप्रदेश आदींसह राज्यातील विविध भागातून स्पर्धक पथक या ठिकाणी सहभागी झाली होती, त्या सगळ्यांचे शहरात स्वागत, अभिनंदन करतो असे चव्हाण म्हणाले. या स्पर्धा केवळ राज्यात नव्हे तर देशभर व्हाव्या आणि ही शिवकालीन, छत्रपती शिवाजी महाराजांपासून सुरू असलेली संस्कृती परंपरा अधिकाधिक दृढ होवो अशा शुभेच्छा जिल्हाधिकारी शिनगारे यांनी दिल्या.

सुजित सोमण, ललित पवार, राजेंद्र घाणेकर, गणेश गुंड पाटील, स्वानंद ठाकूर आदींनी परिक्षकांची भूमिका पार पाडली. शनिवारी या स्पर्धेचा शुभारंभ येथील जिमखाना ग्राउंडवर झाला, विद्यानिकेतन शाळेचे संस्थापक विवेक पंडित, संत साहित्याच्या अभ्यासक डॉ. धनश्री साने, विंदा भुस्कुटे, माधव जोशी, धनंजय साने, महापालिका घनकचरा विभाग उपायुक्त अतुल पाटील  यांसह शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी, स्वामी नारायण ग्रुपचे, शिवसेना युवा नेते दीपेश म्हात्रे आदींनी स्पर्धेचे उदघाटन केले.

राज्य शासनाचा कलासंस्कृती विभाग, खासदार डॉ श्रीकांत शिंदे फाउंडेशन, आमदार राजू पाटील यांचे शांतीरत्न, माजी आमदार अप्पा शिंदे, भाऊसाहेब चौधरी फाऊंडेशन, दीपेश म्हात्रे, उद्योजक माधव सिंग, यांचे सहकार्य मिळाले. तसेच माजी नगरसेवक मुकुंद पेडणेकर, राहूल दामले, मंदा पाटील,  शशिकांत कांबळे, जिमखान्याचे अध्यक्ष दिलीप भोईर, आनंद डिचोलकर, सलील।जोशी आदींनी आवर्जुन उपस्थिती लावली.

सहभागी झालेली पथकेमावळे प्रतिष्ठान, डोंबिवली, वादन एक कला, उरण, शिवसुत्र, बदलापूर, शिवस्वरूप, भिवंडी,आविष्कार, वसई शिवरुद्र, फलटण, शिवसांस्कृती, गोवा , गर्जना, डोंबिवली विघ्नहर्ता, पुणे विशेष आकर्षण : पुण्याचे मानाचे समजले जाणारे रमणबाग ढोल ताशा पथकाने खास डोंबिवलीकर नागरिकांची मागणी असल्याने त्या प्रेमासाठी येथे येऊन पंचवीस मिनिटांचे तडाखेबाज वादन करून रसिकांची मने जिंकली. ढोल ताशा।प्रेमींनी त्याला प्रचंड प्रतिसाद देत वंदे मातरम, जय श्रीराम, भारत माता की जय, छत्रपती शिवजी महाराज की जय अशा घोषणा देऊन आसमंत दणाणून सोडला.

वन्स मोअर आणि शिट्या, टाळ्या...एक से एक दिग्गज पथकांनी येथे येऊन त्यांची कला सादर केली, त्याला रसिकांनी दाद।दिली.।शिट्या, वन्स मोअर, टाळ्या वाजवून रसिकांनी आनंद, जल्लोष व्यक्त केला. तालसंग्रामच्या नावाने चांगभल म्हणत घोषणा दिल्या.

टॅग्स :dombivaliडोंबिवलीmusicसंगीत